आष्टी नगरपंचायतच्या जनमाहिती अधिकारी यांना राज्य माहिती आयोगाने ठोठावला तिस हजार रुपये दंड

आष्टी नगरपंचायतच्या जनमाहिती अधिकारी यांना राज्य माहिती आयोगाने ठोठावला तिस हजार रुपये दंड

आष्टी : ( गोरख मोरे ) आष्टी नगरपंचायतला कैलास दरेकर यांनी माहिती अधिकारात नागरीकांची सनद, सेवाहमी कायदा, लोकसेवा अध्यादेश, तसेच माहिती अधिकार कायदा कलम ४(१)ख अंतर्गत माहिती विचारली होती वरील सर्व माहिती ही जनतेच्या हिताची असल्याने जनतेला ही सर्व माहिती अवलोकनासाठी मिळणं गरजेचं असतं परंतु अशी माहिती नगरपंचायत जनतेपासून लपून ठेवते यामुळे कैलास दरेकर यांनी सदर माहिती घेण्यासाठी दि.३०/४/२०१९ रोजी माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत माहिती मागितली परंतु नगरपंचायत स्थरावर सदर माहिती उपलब्ध करून दिली नसल्याने कैलास दरेकर यांनी राज्य माहिती आयोग खंडपीठ औरंगाबाद यांच्याकडे माहिती अधिकार कायदा २००५च्या कलम १९(३) अपील केले परंतु तदनंतर ही माहिती दिली नाही यामुळे कलम ७(१) चा भंग केला आहे म्हणून त्यांच्याविरुद्ध कलम २० तरतुदीनुसार कारवाई का करण्यात येऊ नये याचा खुलासा आयोगाने मागवला परंतु तरीही खुलासा दिला नाही संधी देवूनही खुलासा न दिल्याने माहिती अधिकार कायद्याकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक असल्याचे दिसून आले. यामुळे अपील क्र. ५६२०/२०१९ ,५६२४/२०१९ ,५६२५/२०१९ ,५६२६/२०१९ या प्रकरणी आयोगाकडील दाखल अपीलात अपीलाथी यांना माहिती उपलब्ध करून दिली नाही . त्यामुळे माहिती अधिकार अधिनियम २००५मधील कलम ७(१)चा भंग झाल्यामुळे अधिनियमातील कलम २०(१) मुळे संबंधित जनमाहिती अधिकारी नगरपंचायत आष्टी हे शिक्षेस पात्र ठरत असल्यामुळे कलम १९(८)क अन्वये राज्य माहिती आयोगाच्या प्राप्त झालेल्या अधिकारान्वे प्रस्तुत प्रकरणी तिस हजार रुपये दंड ठोठावला आहे कारवाईची जबाबदारी ही जिल्हाधिकारी यांच्याकडे निश्चित केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here