पक्षफुटीनंतर शरद पवार गट सक्रीय; रोहणी खडसेंवर मोठी जबाबदारी..

0
242
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

राष्ट्रवादी पक्षफूटीनंतर आज पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून पक्षातील नेत्यांवर जबाबदारी सोपवत नियुक्ती दिली आहे. यामध्ये एकनाथ खडसे यांची कन्या रोहीणी खडसे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे तर तिकडे बीडमध्ये धनंजय मुंडे यांना टक्कर देण्यासाठी बबन गिते यांच्यावर राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे.

भाजपमध्ये आपल्यावर अन्याय होते असे म्हणत भाजपमधील तत्कालीन ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी त्यांच्या हातातील कळम टाकत हातावर राष्ट्रवादीची घड्याळ बांधली होती. आता त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या कन्या रोहीणी खडसे यासुद्धा राष्ट्रवादीत सामील झाल्या आहेत. दरम्यान 2 जुलैच्या राष्ट्रवादी पक्षफुटीनंतर आज पहिल्यांदाच राष्ट्रवादीने नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे. त्यामध्ये रोहीणी खडसे यांच्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्य महिला अध्यक्षपदाची जबाबदारी असणार आहे. तर बीड जिल्ह्यातील बबन गिते यांना पक्षाचे जिल्हाउपाध्यक्ष पद देण्यात आले आहे.

धनंजय मुंडे विरोधात बबन गिते

बीड जिल्ह्यात बबन गिते विरुद्ध धनंजय मुंडे असा अंतर्गत वाद असून, त्यामध्ये बबन गिते यांना बळ देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे. आता बीडमध्ये धनजंय मुंडे यांच्या विरोधात बबन गितेसारखा नेता उभा करण्यात आला असून, बीडमधील बबन गिते यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बबन गिते यांनी धनंजय मुंडे यांची साथ सोडून शरद पवार यांच्या उपस्थितीत बीडमध्ये पक्ष प्रवेश केला होता.
त्यामुळे त्यांना ही संधी देण्यात आल्याचे सांगितले जाते.

दोन्ही गटाकडून भरून घेतली जात आहे शपथपत्र

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांकडून पक्षावर दावा करण्यात आला आहे. दोन्ही गटांकडून ही फुट नसल्याचं सांगितलं जात असलं तरीही कायदेशीर लढाईसाठी तयारी मात्र केली जात आहे. दोन्ही गटांकडून पदाधिकाऱ्यांची शपथपत्रं भरून घेण्याची मोहीम सुरू आहे. निवडणूक आयोगात हे शपथपत्र दाखल केले जाणार असल्याची शक्यता आहे.

रोहिणी खडसे या एकनाथ खडसे यांच्या कन्या आहेत. 2019 मधील विधानसभेत अवघ्या 1800 मतांनी त्यांचा पराभव झाला होता. तर त्यांनी 2019 मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आता त्यांच्याकडे राष्ट्रवादीकडून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here