शेविंग ब्लेडचे 56 तुकडे गिळले, 7 डॉक्टरांकडून तीन तास ऑपरेशन

0
165

राजस्थान : जालौर येथे एक धक्कादायक घटना घडलीय. एका 24 वर्षीय तरुणाच्या पोटातून एक दोन नव्हे तर शेविंग ब्लेडचे 56 तुकडे काढले आहेत.

या तरुणाने आत्महत्या करण्यासाठी हे भयंकर कृत्य केलं. हा तरुण सांचौर येथील एका खासगी कंपनीत नोकरी करतो. तो नोकरीमुळे त्रस्त होता. त्यामुळेच त्याने टोकाचे पाऊल उचलले. डॉक्टरांनी तातडीने ऑपरेशन करून त्याच्या पोटातून ब्लेडचे तुकडे काढले आहेत. त्यामुळे तो बचावला आहे. त्याची प्रकृतीही धोक्याबाहेर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. मात्र, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

यशपाल राव असं या 24 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो बालाजी नगरमध्ये चार मित्रांसोबत राहतो. ब्लेडचे तुकडे गिळल्यानंतर या तरुणाला रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या. त्यामुळे त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्याच्या पोटाचा एक्सरे काढण्यात आला. तेव्हा त्याच्या पोटात शेविंग ब्लेडच्या तुकड्यांचा ढिगाराच दिसला. त्यानंतर डॉक्टरांनी एंडोस्कोपी केली आणि नंतर ऑपरेशन करून एकापाठोपाठ एक करून शेविंग ब्लेडचे 56 तुकडे त्याच्या पोटातून बाहेर काढले.

यशपालची प्रकृती ठिक आहे. डॉक्टरही त्याच्या तब्येतीकडे लक्ष ठेवून आहेत. त्याच्या शरीरातील काही भाग डॅमेज झाला आहे. त्याला इंटरनल डॅमेज झाल्याने मेडिसीन दिली जात आहे. यशपाल हा नोकरीमुळे त्रस्त होता. नोकरीतील त्रासामुळे तो डिप्रेशनमध्ये होता. त्यामुळेच त्याने आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here