हिंदुस्थानच्या राष्ट्रध्वजाला तिरंगा म्हणतात,अन्य देशांच्या झेंड्याला काय म्हणतात हे जाणून घेऊया…

हिंदुस्थान यंदाच्या वर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय. गुलामीच्या जोखडातून मुक्त होऊन हिंदुस्थानला 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ मोहीमही सुरू आहे.

देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर हिंदुस्थानच्या राष्ट्रध्वजाला जसे तिरंगा म्हणतात, तसे पाकिस्तानसह अन्य 15 देशांच्या झेंड्याला काय म्हणतात हे आज आपण जाणून घेऊया…

ब्राझिल –

ब्राझिल या देशाची राजधानी ब्रासिलिया असून या देशाच्या झेंड्याला ऑरिवर्दे (Auriverde) असे म्हटले जाते.

तुर्की –

तुर्की या देशाची राजधानी अंकारा आहे. या देशाच्या झेंड्याला अलबेरक (Albayrak) असे म्हणतात.

कतार –

कतार या देशाच्या राजधानीचे नाव दोहा आहे. या देशाच्या झेंड्याला इन्नाबी (Innabi) या नावाने ओळखले जाते.

मलेशिया –

मलेशियाच्या राजधानीचे नाव क्लालालांपूर आहे. या देशाच्या झेंड्याला जालूर जेमिलांग किंवा स्ट्राइप्स ऑफ ग्लोरी (Jalur Gemilang/Stripes of Glory) असे म्हटले जाते.

आयर्लंड –

आयर्लंडची राजधानी डब्लिन आहे. या देशाच्या झेंड्याला ब्रताश (Bratach) असे म्हणतात.

न्यूझीलंड –

न्यूझीलंड या देशाची राजधानी वेलिंग्टन आहे. या देशाच्या झेंड्याला न्यूझीलंड इनसाइन (New Zealand Ensign) असे म्हणतात.

तिबेट –

तिबेट या देशाची राजधानी ल्हासा आहे. या देशाच्या झेंड्याला स्नो लायन फ्लॅग (Snow lion flag) म्हणतात.

रशिया –

रशिया या देशाची राजधानी मॉस्को असून या देशाच्या झेंड्याला ट्राईकोलोर (Trikolor) असे म्हणतात.

फ्रान्स –

फ्रान्सची राजधानी पॅरीस असून या देशाच्या झेंड्याला फ्रेंच ट्रायकलर (French Tricolor) असे म्हणतात.

ब्रिटन –

ब्रिटनची राजधानी लंडन आहे. या देशाचा झेंड्याला यूनियन जॅक किंवा यूनियन फ्लॅग (Union Jack or Union Flag) म्हणतात. परंतु हा झेंडा यूनियन जॅक नावानेच प्रसिद्ध आहे.

अमेरिका –

अमेरिकेची राजधानी वाशिंग्टन आहे. या देशाच्या झेंड्याला स्टार्स अँड स्ट्राइप्स किंवा स्टार स्पँगल्ड बॅनर किंवा ओल्ड ग्लोरी (Stars and Stripes, Old Glory, Star-Spangled Banner) असे म्हणतात. ओल्ड ग्लोरी नावाने हा झेंडा प्रसिद्ध आहे.

श्रीलंका –

श्रीलंकेची राजधानी कोलंबो आहे. या देसाच्या झेंड्याला लायन फ्लॅग किंवा सिंहा फ्लॅग (Lion Flag / Sinha Flag) म्हणतात.

बांगलादेश –

बांगलादेशची राजधानी ढाका आहे. या देशाच्या झेंड्याला लाल सॉब्ज (Lal Sobuj) असे म्हणतात.

चीन –

चीनची राजधानी बिजिंग असून या देशाच्या झेंड्याला वू शिंग हाँग की (Wu Xing Hong Qi) असे म्हणतात.

पाकिस्तान –

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद असून या देशाच्या झेंड्याला परचम-ए सितारा ओ-हिलाल (Parcam-e Sitarah o-Hilal) असे म्हणतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here