पेट्रोलच्या दरात 9.5 रुपयांची तर डिझेलच्या दरात 7 रुपयांची घट, घरगुती गॅस सिलेंडरला 200 रुपयांची सबसिडी

केंद्र सरकारने अबकारी कर (एक्साईज ड्यूटी) कमी केल्याने देशभरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार आहे. पेट्रोलवरचा अबकारी कर 8 रुपये तर डिझेलवरचा अबकारी कर 6 रुपयांनी कमी करत असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली.याव्यतिरिक्त निर्मला सीतारमण यांनी आणखी काही महत्त्वाच्या घोषणाही यावेळी केल्या.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या घरगुती गॅस सिलेंडरला 200 रुपयांची सबसिडी देण्याचा निर्णयही सरकारने घेतल्याचं सीतारमण यांनी सांगितलं. योजनेच्या 9 कोटी लाभार्थ्यांना एकूण 12 सिलेंडरपर्यंत ही सबसिडी लागू असेल.

नरेंद्र मोदींनी राज्यांना केलं होतं आवाहन

पेट्रोल-डिझेलवरच्या टॅक्समुळे राज्याच्या तिजोरीत भर पडत असली तरी त्यामुळे नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त ताण येत आहे. त्यामुळे राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरचे टॅक्स कमी करावेत, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here