राजकीय

कुणबी नोंदींची आकडेवारी जाहीर करू नका; शिंदे समितीची अधिकाऱ्यांना सूचना


पुणे : मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी शिंदे समतीकडून राज्यभरात मराठा कुणबी नोंदी शोधल्या जात आहे. दरम्यान, असे असतानाच मराठा समाजाच्या सापडलेल्या कुणबी नोंदींची आकडेवारी जाहीर करू नका अशा सूचना न्या.शिंदे समितीने पुणे दौऱ्यात विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत एका दैनिकात वृत्त देण्यात आले आहे.

शिंदे समितीने पुणे दौऱ्यात विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत एका दैनिकात वृत्त देण्यात आले आहे.

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचे तत्काळ थांबवण्याची मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. तसेच, अचानक एवढ्या नोंदी कशा सापडत आहेत असा सवाल देखील ओबीसी नेत्यांकडून केला जात आहे. तर यावरूनच मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्याकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘आपापल्या विभागात, जिल्ह्यांत सापडलेल्या कुणबी नोंदी, दिलेली प्रमाणपत्रे याची आकडेवारी जाहीर करू नका,’ अशा सूचना न्या. शिंदे समितीने पुणे दौऱ्यात विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे समोर येत आहे.

मराठा कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहीत करण्यासाठी गठित केलेल्या समितीची अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या उपस्थितीत पुणे येथे आढावा बैठक पार पडली. बैठकीत जात नोंदीच्या पुराव्याबाबत सविस्तर चर्चा. यावेळी पुणे विभागीय आयुक्त, पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह संबंधित सर्व अधिकारी यावेळी उपस्थित होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *