Video: आई, आईच असते! भररस्त्यात लेकाला दिला चोप..

0
218
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

लहान असताना अनेकांनी आपल्या आईचा मार खाल्ला असेल. आईने धु- धु धूतला असेल. पण त्यामागे कारण आपल्याचं भल्याच असतं. सध्या सोशल मीडियावर असाच एक सुंदर व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आई भररस्त्यात मुलाला चोपताना दिसत आहे. पण त्यांच कारण अगदी खास आणि कौतुक करण्यासारखं आहे बरं.. काय आहे या व्हायरल व्हिडिओची कथा, चला जाणून घेवू…

 

काय आहे प्रकरण…

सध्या वाढते रस्ते अपघात हा सर्वत्र चिंतेचा विषय ठरत आहे. या वाढत्या अपघातांना अनेकदा आपलाद हलगर्जीपणा किंवा वाहतुकीचे नियम न पाळण्याचा आडमुठेपणाही कारणीभूत ठरतो. त्यामुळे आपल्याला नेहमी हेल्मेट घालून गाडी चालवावी, असे सांगितले जाते. मात्र मुले नेहमीच या गोष्टीकडे दुर्लक्ष करताना दिसतात.

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्येही आईने याचमुळे मुलाला फैलावर घेतल्याचे दिसत आहे. मुलाने हेल्मेट न घातला गाडी चालवत असल्याचे आईच्या लक्षात येते. ज्यामुळे ती संतापते आणि पाठलाग करुन गाडी थांबवत बिचाऱ्याला भर रस्त्यात चोपून काढत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

भर रस्त्यात केली धुलाई….

व्हिडिओमध्ये (Viral Video) एक मुलगा आणि मुलगी बुलेटवरुन प्रवास करताना दिसत आहेत. दोघांच्याही हातात हेल्मेट आहे. मात्र ते न घालताच ते प्रवास करत आहेत. गाडी सिग्नलला थांबल्यानंतर पाठीमागून त्यांची आई थेट धावत येते आणि मुलाला फैलावर घेते. हेल्मेट काय दाखवायला दिलंय का म्हणत ती भररस्त्यात त्याला मारत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

मुलाने हेल्मेट न घातल्याने आई इतकी संतापलीय की, त्याच्याशी वाद घालून तिचा जीव अक्षरशः कासावीस झाल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. अपघात व्हायला एक क्षण लागतो का असे म्हणत ती हेल्मेट घालण्याचे फायदे सांगत मुलासोबत भांडताना यामध्ये पाहायला मिळत आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी तोंड भरुन कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here