कार्यालयाच्या दहाव्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या


एक हायप्रोफाईल प्रकरण मानले जात आहे. रॉ अधिकाऱ्यानेच आत्महत्या केल्याची घटना गंभीर आहे. अधिकारी तणावात असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र अधिकारी नेमका कोणत्या कारणामुळे तणावात होता हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

दिल्ली : रॉ अधिकाऱ्याने कार्यालयाच्या दहाव्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दिल्लीतील लोधा कॉलनी परिसरात घडली आहे. अधिकाऱ्याने आत्महत्या का केली याचे नेमके कारण समजू शकले नसले, तरी तणावातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदन अहवालानंतर अधिक माहिती कळेल. अधिकाऱ्याचे नाव कळू शकले नाही.

तपासानंतरच आत्महत्येचे कारण स्पष्ट केले

रॉ अधिकाऱ्याची आत्महत्या ही संवेदनशील घटना असल्याने पोलीस सध्या यावर अधिक बोलणे टाळत आहेत. सध्या पोलीस प्रकरणाचा सर्व बाजूने तपास करत आहेत. तपासानंतरच अधिकारी घरगुती कारणामुळे तणावात होती की ऑफिसमधील काही समस्या होत्या, याबाबत खुलासा होईल.

✍️✍️हे ही वाचा

नवगण न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

लोकशाही न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here