9.2 C
New York
Saturday, April 20, 2024

Buy now

बीड जिल्हा रूग्णालयातील कंत्राटी भरती गैरव्यवहार प्रकरणात पाठराखण केल्याबद्दल डाॅ.सुरेश साबळे यांच्यावर प्रशासकीय कारवाई करा

- Advertisement -

बीड : बीड जिल्हा रूग्णालयात कोविड १९ कालावधीत वाढीव मनुष्यबळापेक्षाही आधिकचे मनुष्यबळ नियुक्त करून गंभीर प्रशासकीय अनियमितता करत मोठ्याप्रमाणात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर,भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर यांनी जिल्हाधिकारी बीड यांना केल्यानंतर दि.३० मार्च २०२२ रोजी जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड डाॅ.सुरेश साबळे यांना त्याअनुषंगाने चौकशी करून नियमानुसार आवश्यक कार्यवाहीबाबत लेखी पत्र देऊन अर्जदारास परस्पर कळवण्याबाबत कळवुन अद्याप महिना उलटून सुद्धा कोणतीही कारवाई न केल्याबद्दल डाॅ.सुरेश साबळे यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांना निवेदनाद्वारे ९ मे रोजी जिल्हारूग्णालय बीड येथे आंदोलनाचा ईशारा दिला आहे.

- Advertisement -

सविस्तर माहीतीस्तव
_______
बीड जिल्हा रूग्णालयात कोविड १९ साथरोग परिस्थिती हाताळण्यासाठी कोविड आरोग्य संस्थेमध्ये कंत्राटी पद्धतीने तात्पुरती पदे नेमण्यासाठी दि.२७ /०७/२०२० रोजी जाहीरात देण्यात आली होती, सदर भरतीसाठी अतिरिक्त जिल्हाशल्यचिकित्सक व निवासी वैद्यकीय आधिकारी (बाह्य संपर्क)जिल्हा रूग्णालय बीड यांची द्विसदस्य समिती नियुक्त करण्यात आली होती, भरती प्रक्रिया करण्यासाठी डाॅ.माने महेशकुमार यांना हाॅस्पिटल मॅनेजरची जवाबदारी देण्यात आली होती, परंतु या समितीने आयुक्त, मुंबई यांच्या दि.२१/०५/२०२० च्या निर्देशीत केलेल्या सूचनानुसार भरती प्रक्रीयेत काटेकोरपणे पालन न करता अतिरिक्त पदे भरणा केली. तत्कालीन मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड यांनी वेळोवेळी निर्देशित केलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन न करता जिल्हारूग्णालय डीसीएच बीड येथे ६३ , नर्सिंग हाॅस्टेल येथे ५३ ,व डीसीएच आयटीआय येथे ०५ असे एकुण १२१ कर्मचा-यांची अतिरिक्त भरती करण्यात आली.मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड यांनी वेळोवेळी रूग्णसंख्या कमी झाल्यानंतर मनुष्यबळ कमी करणे आदेशित असताना देखील कमी केले नाहीत, तसेच दि.०४ /०६/२०२१ आणि दि.११ /०६/२०२१ नुसार बंद करण्यात आलेल्या संस्थामधील कंत्राटी कर्मचारी एकुण २१६ यांना देखील कामावरून कमी केले नाही, त्यामुळेच सदरील कंत्राटी कर्मचारी यांचे मानधन देण्यासाठी अडचणी उदभवल्या, सदरील कर्मचारी हे जिल्हारूग्णालय परिसरात उपोषण, निदर्शने करत आहेत, वाढीव मनुष्यबळापेक्षाही आधिकचे मनुष्यबळ नियुक्त करून गंभीर अशी प्रशासकीय अनियमितता या समितीने केली आहे.

- Advertisement -

मुख्य कार्यकारी आधिकारी अजित कुंभार यांचे आदेश डावलले; निलंबनाची शिफारस
______
जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड अथवा जिल्हाशल्यचिकित्सक बीड यांची कोणतीही परवानगी न घेता अशा नियुक्त्या देण्यात आल्या आहेत, सीसीसी या संस्था बंद पडल्यानंतर कंत्राटी कर्मचारी यांच्या सेवा खंडीत करणे अपेक्षित असताना असे केले गेले नाही व प्रशासनाला अंधारात ठेवल्यामुळे वेतनचा प्रश्न निर्माण झाला आहे.
तत्कालीन मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड अजित कुंभार यांनी टीपन्नीमध्ये स्पष्टपणे डाॅ.राठोड, अतिरिक्त जिल्हाशल्यचिकित्सक यांनी या वाढीव मनुष्यबळापेक्षाही अधिकचे मनुष्यबळ नियुक्त करून गंभीर अशी प्रशासकीय अनियमिता केली आहे यास्तव रूपये ४४,३९९२ /- अतिरिक्त खर्च केलेले आहे, ही बाब अतिशय गंभीर असून शिस्तभंगविषयक कारवाईस पात्र आहे.सर्व बाबींचा विचार करता डाॅ.सुखदेव राठोड, डाॅ.महेश माने, डाॅ.ढाकणे हे तिघेही दोषी असल्याचे मत व्यक्त केलेले आहे तर जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड यांनी चौकशी करून आयुक्त यांना अहवाल सादर करत निवड समितीतील तिन्ही दोषींवर निलंबनाची कार्यवाही करणेबाबत कळवले आहे.
तरी कोविड कालावधीत सर्वसामान्य जनता त्रस्त असताना बीड जिल्हा रूग्णालयातील वरील निवड समितीने अनाधिकृत पद भरती करून मोठ्याप्रमाणात अनियमितता व आर्थिक गैरव्यवहार केला असून संबधित प्रकरणात दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.

९ मे रोजी जिल्हारूग्णालयात धरणे आंदोलन:-डाॅ.गणेश ढवळे
___

दि.२१ मार्च २०२२ रोजी वरील प्रकरणात जिल्हाधिकारी बीड यांना निवेदन दिल्यानंतर दि.३० मार्च २०२२ रोजी जिल्हाधिकारी बीड यांनी जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड डाॅ.सुरेश साबळे यांना निवेदन प्रकरणी नमुद मुद्यांबाबत आपल्या स्तरावरून तात्काळ चौकशी करून शासन नियमानुसार आवश्यक कार्यवाहीबाबत व केलेल्या कार्यवाहीबाबत संबधित अर्जदारास परस्पर कळवण्याबाबत कळवुन महिना पुर्ण उलटुन सुद्धा अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्यामुळेच दि.९ मे सोमवार रो
जी बीड जिल्हारूग्णालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा ईशारा करण्यात आला आहे.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles