धनंजय मुंडेच्या मार्गदर्शनाखाली अपडेट, राशन कार्ड सप्ताह (कॅम्प) चे आयोजन-डॉ.संतोष मुंडे

 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : तालुक्‍यातील फाटलेले, नाव दुरूस्ती व अपडेट राशन कार्डचा सप्ताह (कॅम्प) चे सामाजिक न्याय व विशेष मंत्री तथा बीड जिल्हाचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी दिली आहे.
गरीब, गरजु व सर्व सामान्य जनतेचे गेल्या विस ते तिस वर्षापुर्वीचे राशन कार्ड दुरूस्ती व अपडेट , खुप जुने झाल्यामुळे फाटलेले, झिजलेले, व खराब जालेले राशन कार्ड त्यांना नुतनीकरण करून देणे, आपडेट नसतील तर ते अपडेट करून (१२ अंकी नंबर) नाव कमी किंवा नावलावून देणे गरजेचे आहे. कारण गरीब, गरजु, शेतकरी, कामगार वर्ग, सर्व सामन्य जनता, दिव्यांग, ज्येष्ठ नागरीक विधवा महिला इत्यादी समाजातील गरजू घटकास आरोग्य सेवेचा लाभ घेण्यास, बँकेत बऱ्याच व्यवहारात राशन कार्ड अती महत्वाचे असते /लागते यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य असा जनतेस सहाय्य व्हावे करिता राशन कार्ड सप्ताहाचे लवकर आयोजन करण्यात येणार आहे. दरम्यान पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांना पत्र दिले आहे अशी माहिती धनंजय मुंडे आरोग्य योजनेचे प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडेंनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here