26.9 C
New York
Monday, April 29, 2024

Buy now

Video रस्ता ओलांडणारी एक नीलगाय दुचाकीस्वाराला जाऊन धडकली यात मुकेश आणि नीलगाय या दोघांचाही मृत्यू झाला

- Advertisement -

अपघाताची एक अतिशय विचित्र घटना समोर आली आहे. अयोध्येतील इनायतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रायबरेली महामार्गावर एक अपघात झाला. या अपघातात नीलगायीने धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला.

- Advertisement -

ही घटना रसूलपूर मिठेगाव गावात असलेल्या टोलनाक्यावर घडली. ही घटना टोल प्लाझावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा होत आहे.

- Advertisement -

राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात रस्ता ओलांडणाऱ्या निलगायीने धडक दिल्याने 28 वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला होता. धडक दिल्यानंतर गायीचे शिंग तरुणाच्या छातीत शिरले. विजयी पाठक गावातील सुरेंद्र नाथ पांडे यांचा मुलगा मुकेश पांडे अशी मृताची ओळख पटली आहे. मुकेश इनायत नगर बाजारपेठेत जात असताना ही दुर्दैवी घटना घडली.

 

मिठे गावाजवळ रस्ता ओलांडणारी एक नीलगाय दुचाकीस्वाराला जाऊन धडकली आणि अनेक मीटर दूर फेकली गेली. ही भीषण टक्कर जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मुकेश आणि नीलगाय या दोघांचाही मृत्यू झाला. स्थानिक नागरिक आणि रस्त्यावरून जाणाऱ्यांनी जखमी दुचाकीस्वाराला तातडीने रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. मात्र, मुकेशचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

गावकऱ्यांनी सांगितलं, की मुकेशच्या लग्नाला जवळपास पाच वर्षे झाली असून, त्याला पिहू नावाची चार वर्षांची मुलगी आहे.

नेमकं काय घडलं –
व्हिडिओमध्ये दिसतं की दुचाकीस्वार रस्त्याने आपली दुचाकीवर चालला आहे. इतक्यात एक गाई वेगात रस्ता पार करू लागली. वेगात आलेल्या या गायीने मुकेशच्या दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत मुकेशच्या छातीमध्ये गायीची शिंगं शिरली. याशिवाय तो जोरात रस्त्यावर पडला. यात गंभीर जखमी झालेल्या मुकेशचा मृत्यू झाला.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles