एकाचवेळी तीन मित्रांवर अंतिमसंस्कार

सोलापूर: मुंबई-पुणे हायवेवरील खोपोलीजवळ काल झालेल्या अपघातात सोलापुरमधील तिघांचा मृत्यू झाला. या तिघांवर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेला ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
शोकाकुल वातावरणात तिघांना शेवटचा निरोप देण्यात आला.

अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या गौरव खरात, सौरव तुळसे आणि सिद्धार्थ राजगुरूच्या अंत्ययात्रेसाठी मोठी गर्दी जमली होती. मृत गौरव खरात हे काँग्रेस पक्षाशी होते संबंधित होते. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना भेटण्यासाठी जात असताना त्यांच्या कारला अपघात झाला. सोलापुरातील मोदी स्मशानभूमीत एकाचवेळी तीन मित्रांवर अंतिमसंस्कार झाले. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे, नितीन राऊत यांनी काल खालापुरात मृतदेहांचं अंत्यदर्शन घेतलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here