पत्नीला शेततळ्यात बुडताना पाहून वाचवायला गेलेला पती देखील दुर्दैवी रित्या बुडाला

सोलापूर जिल्ह्यात शेततळ्यात आणि नदीमध्ये बुडवून मृत्यूच्या घटना घडलेल्या असतानाच अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील अंचलगाव येथेही एक घटना घडली, ज्यामध्ये पत्नीला शेततळ्यात बुडताना पाहून वाचवायला गेलेला पती देखील दुर्दैवी रित्या बुडाला.या दुर्दैवी घटनेत पूजा निलेश शिंदे या 22 वर्षीय विवाहितेसह तिच्या 27 वर्षीय निलेश रावसाहेब शिंदे या पतीला देखील प्राण गमवावे लागले. मंगळवारी संध्याकाळी लाईट नसल्यामुळे जनावरांना पाणी पाजण्यासाठी वीजपंप सुरू करता येत नव्हता. त्यामुळे निलेश आणि पूजा दोघेही पाणी आणण्यासाठी शेततळ्यावर गेले.

मात्र शेततळ्यातील प्लास्टिकच्या कागदावर होऊन तिचा पाय घसरला आणि ती पाण्यात बुडाली. पूजा हिला शेततळ्यात बुडताना पाहून निलेश तिला वाचवण्यासाठी धावला. त्यानेही शेततळ्यात उडी मारली.

मात्र तिला वाचविण्याच्या प्रयत्नात त्याचाही दुर्दैवी मृत्यू झाला. कोपरगाव ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेने अंचलगाव सह कोपरगाव तालुक्यावर शोककळा पसरली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here