सातारा : येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (Jalna ACB) पोलीस निरीक्षक संग्राम ताटे Police Inspector Sangram Tate (रा.
यशवंत नगर, जालना मुळ रा. मारुल, ता. कराड, जि. सातारा) हे 2 फेब्रुवारीच्या रात्रीपासून बेपत्ता (Missing) झाले होते. मित्राला भेटण्यास जात असल्याचे सांगून ते रात्री घराबाहेर पडले होते. त्यानंतर त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. महत्त्वाचे म्हणजे ताटे यांनी घराबाहेर पडताना मोबाईल, गाडी असे काहीही नेले नाही. एसीबीमधील पोलीस अधिकारी गायब झाल्याने महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दल हादरुन गेलं. दरम्यान, संग्राम ताटे हे शिरवळ (Shirwal) येथे सापडले असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून संग्राम ताटे (Police Inspector Sangram Tate) यांचा शोध घेतला जात होता. याचदरम्यान संग्राम ताटे हे 13 दिवसानंतर बेशुद्ध अवस्थेत सापडले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात (Private Hospital) उपचार सुरु आहेत. एक पोलीस अधिकारी अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली होती. त्यांचा सर्वत्र शोध घेतला जात होता. मात्र, ते सापडत नव्हते. अखेर ते 13 दिवसानंतर बेशुद्ध (Unconscious) अवस्थेत सापडले असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.
जालना एसीबीत संग्राम ताटे हे कर्तव्य बजावत असताना त्यांना 20 दिवसांपूर्वीच प्रमोशन (Promotion) मिळाले आहे.
त्यानुसार त्यांची कोकणात बदली (Transfer) झाली होती.
याच दरम्यान 2 फेब्रुवारी रोजी ते जालना येथील घरातून बाहेर पडले.
बराचवेळ झाल्यानंतर ते घरी परत न आल्याने त्यांच्या पत्नीने शोधाशोध केली.
पती सापडत नसल्याने त्यांनी पोलिसांशी संपर्क केला.
पोलिसांनी यासंदर्भात सर्व माहिती घेऊन ताटे यांचा शोध सुरु केला. मात्र ताटे यांचा काहीच ठावठिकाणा लागत नव्हता.
—
याच दरम्यान ताटे हे बेपत्ता असल्याची नोंद जालना पोलीस ठाण्यात (Jalna Police Station) झाली. पोलीस अधिकारी बेपत्ता झाल्याने महाराष्ट्र पोलीस दल त्यांच्या तपासाच्या कामाला लागले. गेल्या चार दिवसांपूर्वी ते सांगली शहरात (Sangli City) फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कसून शोध घेतला. मात्र ते पोलिसांना सापडले नाहीत.
रविवारी (दि.13) दुपारी (Satara District) शिरवळ येथे एक जण बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे परिसरातील एका व्यक्तीला दिसले.
त्या व्यक्तीला संग्राम ताटे यांच्या हातावर मोबाईल नंबर लिहिल्याचे दिसून आले.
या क्रमांकावर त्या व्यक्तीने फोन केल्यावर संग्राम यांच्या पत्नीने तो फोन उचलला.
संग्राम यांचे वर्णन सांगताच त्यांनी ओळखले. यानंतर त्यांच्या पत्नीने तातडीने याची माहिती कराड (Karad) येथील कुटुंबियांनी दिली.
संग्राम यांची माहिती मिळताच कुटुंबियांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
पोलीस निरीक्षक संग्राम ताटे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.
त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना कराड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती त्यांचे नातेवाईक शिवाजीराव इंगवले (Shivajirao Ingwale) यांनी दिली.