8.8 C
New York
Thursday, April 18, 2024

Buy now

Home Blog

Video चमत्कार ! असा अपघात तुम्ही याआधी कधीच पाहिला नसेल, भरधाव ट्रकखाली बाईक घसरली,मृत्यूला दिला चकवा

हैदराबादमधील एका हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका दुचाकीस्वाराची दुचाकी एका भरधाव ट्रकखाली अडकल्याने तो थोडक्यात बचावला. हैदराबादमधील एका गजबजलेल्या रस्त्यावर ही घटना घडली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक दुचाकीस्वार ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा तोल गेला आणि दुचाकी ट्रकच्या पुढील चाकाखाली अडकली.  बाईक ट्रकखाली अडकते, मात्र आश्चर्याची बाब म्हणजे ट्रकच्या फूटबोर्डवर चढून दुचाकीस्वार आपला जीव वाचवतो.

हा व्हिडिओ लोकांना आश्चर्यचकित करत असून बाइकस्वाराच्या धैर्याचे आणि नशिबाचे कौतुक केले जात आहे. ट्रकचालकाच्या निष्काळजीपणावरही काही जण प्रश्न उपस्थित करत आहेत. रस्त्यावर सावधगिरी बाळगणे किती महत्त्वाचे आहे याची आठवण करून देणारी ही घटना आहे. छोटीशी चूकही किती जीवघेणी ठरू शकते हे यातून दिसून येते.

Video पंतप्रधान मोदींच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य, झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते नजरुल इस्लाम यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण कमालीचं तापलं आहे.

त्यातच आता झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते नजरुल इस्लाम यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते पंतप्रधान मोदींच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य (jmm leaders controversial statement on pm Narendra modi) करताना दिसत आहेत. या वक्तव्यावरून नजरूल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून भाजपने त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली आहे.

या वक्तव्यानंतर भाजपने इंडिया आघाडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra modi) जीवघेणा हल्ला करण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोपही केला आहे. दरम्यान आपण पंतप्रधानांविरोधात कुठल्याही प्रकारचे आक्षेपार्ह वक्तव्य केलेले नसूनआपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याचे नजरुल इस्लाम यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले नजरुल इस्लाम-
वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी पोलिसांनी नजरुल इस्लामविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्येते म्हणतात की, नरेंद्र मोदी हुकूमशहा होत आहेत. त्यांच्या आत्म्यात आता हळुहळू हिटलर बसताना दिसत आहे. मोदींना राज्यघटना बदलायची आहे. आम्ही ४०० पार जाऊ, अशी घोषणा त्यांनी दिलीली आहे. मात्र मीतुम्हाला सांगतो, ४०० जागा नाही, तर नरेंद्र मोदीला ४०० फूट आत गाडले जाईल. यानंतर उपस्थित लोक टाळ्या वाजवतात. मात्र, हिंदुस्तान टाईम्स मराठी या व्हायरल व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टी करत नाही.

दरम्यान भाजपचे झारखंडमधील प्रवक्ते प्रतुल शाहदेव यांनी इंडिया आघाडीवर आरोप केले की, त्यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जीवघेणा हल्ला करण्याचा कट रचला जात आहे. नजरुल इस्लाम यांचे वक्तव्य व्हायरल होऊन २४ तास उलटूनही त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. यामुळे या वक्तव्यांना सरकारचा पाठिंबा असल्याचे दिसते.

यापूर्वी, कोडरमा येथे एका आरजेडी नेत्यानेही मोदींसंदर्भात आक्षेपार्ह विधान केले होते. या घटनाक्रमावरून स्पष्ट होते की, INDIA चे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काही तरी मोठी घटना घडवून आणण्याचा कट रचत आहेत.

भाजपचीनिवडणूक आयोगाकडे तक्रार –
‘झामुमो’ च्या केंद्रीय समिती सदस्याच्या वक्तव्यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन देऊन भाजपने नजरुल इस्लाम यांच्या अटकेची मागणी केली आहे.

Video अयोध्येत रामललाला ‘सूर्यतिलक’, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑनलाईन घेतलं दर्शन

आज रामनवमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीनंतर रामललाची ही पहिलीच रामनवमी आहे. आज रामललाचा दिव्य राज्याभिषेक झाला आज आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला ते रामललाचा ‘सूर्यतिलक’.

दुपारी १२ वाजता रामललाचे सूर्य तिलक करण्यात आले. खास तंत्रज्ञानाच्या मदतीने सूर्यकिरणे रामललाच्या कपाळाच्या मधोमध पडल्याचे दिसून आले. राम मंदिरात जेव्हा रामललाचा सूर्य टिळक सोहळा होत होता, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाममधील नलबारी येथे एका जाहीर सभेला संबोधित करत होते. पण जाहीर सभेला संबोधित केल्यानंतर लगेचच पीएम मोदींनी त्यांच्या टॅबमध्ये अयोध्येतील रामललाच त्या अद्भुत क्षणी पाहिले. खुद्द पीएम मोदींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करून ही माहिती आणि फोटो शेअर केला आहे.

पीएम मोदी जेव्हा राम ललाच्या सूर्य टिळकांचा अद्भूत क्षण पाहत होते तेव्हा त्यांच्या पायात बूट नव्हते. पीएम मोदींनी त्यांच्या टॅबमध्ये रामललाचे दर्शन घेतले आणि त्यांना नमस्कार केला. पीएम मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘नलबारी सभेनंतर मला अयोध्येत रामललाच्या सूर्य टिळकांचा अद्भुत आणि अनोखा क्षण पाहण्याचे भाग्य मिळाले. श्री रामजन्मभूमीचा हा बहुप्रतिक्षित क्षण सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे. हे सूर्य टिळक विकसित भारताच्या प्रत्येक संकल्पाला आपल्या दैवी उर्जेने अशा प्रकारे उजळून टाकतील’.

 

रामनवमीच्या मुहूर्तावर बुधवारी अयोध्येत आरसे आणि भिंगांचा समावेश असलेल्या विस्तृत यंत्रणेद्वारे रामललाचे ‘सूर्य टिळक’ करण्यात आले. या यंत्राद्वारे सूर्याची किरणे रामाच्या मूर्तीच्या कपाळापर्यंत पोहोचली. २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या नवीन मंदिरातील राम मूर्तीच्या अभिषेकानंतर ही पहिली रामनवमी आहे.

मंदिराचे प्रवक्ते प्रकाश गुप्ता यांनी सांगितले की, ‘सूर्य टिळकांचे दर्शन सुमारे चार-पाच मिनिटे करण्यात आले, सूर्याची किरणे थेट राम लालांच्या मूर्तीच्या कपाळावर केंद्रित झाली.

सीएसआयआर-सीबीआरआय, रुरकीचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. डीपी कानुंगो म्हणाले, ‘योजनेनुसार, शास्त्रज्ञांनी मंगळवारी दुपारी १२ वाजता रामललाच्या सूर्य टिळकांची चाचणी केली.’सूर्य टिळक प्रकल्पाचा मूळ उद्देश रामनवमीच्या दिवशी श्री रामाच्या मूर्तीच्या डोक्यावर टिळक लावणे हा आहे.’ असं शास्त्रज्ञ डॉ. एसके पाणिग्रही म्हणाले होते.

रात्री खोलीत झोपले मुलगा, सून अन् तिचा भाऊ; सकाळी दरवाजा उघडताच …

दिल्लीतून एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. रामनवमीच्या दिवशी पूर्व दिल्लीतील शकरपूर भागात 97 ए या घरातून लोकांच्या किंकाळ्या ऐकू आल्याने खळबळ उडाली. शेजारी राहणाऱ्या लोकांनी आरडाओरडा ऐकला आणि ते घर गाठलं तेव्हा त्यांना संपूर्ण घटनेची माहिती मिळताच सर्वजण आश्चर्यचकित झाले.

एक वृद्धाचा नातू घरातील खोलीत होता आणि मुलगा बेपत्ता होता. एवढंच नाही तर सून आणि सुनेच्या भावाचे मृतदेह खोलीत पडले होते.
एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या श्रेयने स्वतःची 29 वर्षीय पत्नी आणि 18 वर्षांच्या मेहुण्याची चाकूने भोसकून हत्या केल्याचे सांगितले जात आहे. कारण या घटनेनंतर तो घरातून फरार आहे. गुन्हा केल्यानंतर श्रेय घटनास्थळावरून पळून गेल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, ही हत्या का झाली आणि त्यामागचे कारण काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
बुधवारी सकाळी पहिल्या मजल्यावर राहणारे श्रेयचे वडील आपल्या मुलाला उठवण्यासाठी गेले असता या घटनेची माहिती मिळाली. वर गेल्यावर दरवाजा उघडा असल्याचे त्यांना दिसले. खोलीचा दरवाजा उघडताच त्यांनी पाहिलं की त्यांचा दोन वर्षांचा नातू (श्रेयचा मुलगा) बेडवर पडलेला होता, तर खोलीतच श्रेयची पत्नी आणि मेहुण्याचे मृतदेह पडलेले होते. खोलीतील हे दृश्य पाहून ते किंचाळले. आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक तात्काळ त्यांच्या घरी आले.
यानंतर या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपी श्रेयचा शोध सुरू आहे. असं सांगितलं जात आहे की श्रेयच्या दोन वर्षांच्या मुलाचा वाढदिवस दोन दिवसांनी म्हणजेच 19 तारखेला आहे, ज्याला उपस्थित राहण्यासाठी श्रेयच्या पत्नीचा भाऊ आला होता. हे संपूर्ण घर तीन मजली असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांचं म्हणणं आहे की, कुटुंबीयांनी दिलेल्या जबाबात अनेक विरोधाभास असून गुन्ह्याच्या ठिकाणीही छेडछाड करण्यात आली असावी, असा संशय आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांची भूमिका तपासली जात आहे.

Video अद्भुत ! सूर्य किरणांचा रामलल्लाला ‘सूर्यतिलक’, ५ मिनिटांच्या अभिषेकाने अयोध्यानगरी मंत्रमुग्ध

अयोध्येत आज (दि.१७) दुपारी १२ वाजता रामलल्लाचा सूर्यतिलक सोहळा पार पडला. अभिजित मुहूर्तावर सुर्यकिरणांनी रामलल्लाच्या कपाळाला स्पर्श केला. भक्ती आणि विज्ञानाचा अद्भुत संगम आज जगाने भक्तिभावाने पाहिला.

वाल्मीकी रामायणाप्रमाणे त्रेतायुगात याचवेळी व मुहूर्तावर प्रभू श्रीरामाचा जन्म झाला होता.

अयोध्येतील सूर्यतिलकप्रसंगी नऊ शुभ योगासह तीन ग्रहांची स्थिती त्रेतायुगात होती, तशीच यावेळीही होती. दुपारी १२ वाजता सूर्यतिलक झाला. तेव्हा केदार, गजकेसरी, पारिजात, अमला, शुभ, वाशी, सरल, काहल आणि रवियोग घडले. या नऊ शुभ योगांत रामलल्लांचा सूर्यतिलक झाला. रामजन्मप्रसंगी सूर्य आणि शुक्र आपल्या उच्च राशीत होते; तर चंद्र स्वतःच्या राशीत उपस्थित होता. या वर्षीही योगायोगाने असेच घडत आहे. ग्रहांची ही दशा देशासाठी शुभ संकेत आहे, असे ज्योतिष तज्ज्ञांचे मत आहे.

सूर्यतिलक समारंभ आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने झाला. शिखरावर रिफ्लेक्टर यंत्रणा बसविण्यात आली होती त्याद्वारे सूर्याच्या किरणांनी प्रवास केला व गर्भगृहात रामलल्लाच्या कपाळावर पडलीत. दुपारी १२.०१ वाजता सूर्याची किरणे रामलल्लाच्या चेहऱ्यावर पडली. कपाळावर सुमारे ७५ मिमीचा टिळक लावण्यात आला होता. सूर्यतिलक स्पष्टपणे दिसावा व रामलल्लालाही उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून कपाळावर चंदनाचा लेप लावण्यात आसा होता. हा भक्ती आणि विज्ञानाचा अद्भुत संगम रामभक्त भक्तिभावाने पाहत राहिले.

 

पाच मिनिटे राहिला तिलक

या सूर्यतिलक सोहळ्याची शास्त्रज्ञांनी अनेक महिने तयारी केली होती. यासाठी अनेक चाचण्या घेण्यात आल्या होत्या. शास्त्रज्ञांनी अयोध्येत आकाशातील सुर्याच्या हालचालीचा अभ्यास केला होता. नेमकी दिशा निश्चित केल्यानंतर मंदिराच्या वरच्या मजल्यावर रिफ्लेक्टर आणि लेन्स बसवण्यात आल्या. सूर्यकिरणे फिरून रामलल्लाच्या कपाळावर पोहोचली. सूर्याची किरणे वरच्या भिंगावर पडली. त्यानंतर, ती तीन लेन्समधून गेली आणि दुसऱ्या मजल्यावरील आरशात आली. शेवटी सूर्याची किरणे ७५ मिमीच्या आकारात राम लल्लाच्या कपाळावर चमकत राहिली. दुपारी १२.०१ वाजताच सूर्याची किरणे थेट रामाच्या चेहऱ्यावर पोहोचली. १२.०१ ते १२.०६ पर्यंत सूर्याभिषेक चालू होता. हे सुमारे पाच मिनिटे सुरू होते.

स्वर्णजडित पीत-गुलाबी पोशाख

रामनवमीनिमित्ता रामलल्लांना पिवळा-गुलाबी रंगाचा स्वर्णजडित पोशाख परिधान केला आहे. सोन्याच्या धाग्यांनी या पोशाखावर नक्षीकाम करण्यात आलेले आहे.

कारमध्ये विद्यार्थ्यासोबत नग्नावस्थेत आढळली महिला शिक्षिका,आपल्या 17 वर्षीय विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध

अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यात महिला शिक्षिकेवर कारमध्ये आपल्या 17 वर्षीय विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध ठेवण्याचा आरोप आहे. यासाठी तिला अटक करण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे या महिलेचा पती अमेरिकेच्या सुरक्षा विभागात एक मोठा अधिकारी आहे.

नेब्रास्कामध्ये सहमतीने संबंध ठेवण्याचं वय 16 वर्ष आहे. पण महिलेविरोधात धमकावण्याची, गोंधळ घालण्याची केस दाखल करण्यात आली आहे. यासाठी तिला 20 वर्षाची शिक्षा होऊ शकते.

महिलेचं नाव एरिन वार्ड असून तिचं वय 47 वर्षे आहे. ती 17 वर्षीय विद्यार्थ्यासोबत कारमध्ये नग्नावस्थेत आढळून आली. तिने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला तर विद्यार्थी केवळ आपल्या अंडरविअरमध्ये पळाला.

पोलिसांना रस्त्यावर एक संशयास्पद कार उभी असल्याची सूचना मिळाली होती. न्यूयॉर्क पोस्टनुसार, त्यांना होंडा सेडानच्या मागच्या सीटवर 45 वर्षीय महिला आणि विद्यार्थी आढळून आला. मुलाच्या अंगावर कपडे नव्हते आणि मग तो पुढच्या सीटवर आला. तो गाडी चालवत निघून गेला. पण काही अंतरावर जाऊन कारचा अपघात झाला. त्यानंतर तो तिथून पळून गेला. एका तासाने पोलिसांनी त्याला अंडरविअरमध्ये पकडलं.

असं सांगण्यात आलं की, महिलेने विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवल्याचं कबूल केलं आहे. तिच्याकडे ओमाहा पब्लिक स्कूलचं आयडीही सापडलं. त्याशिवाय महिलेने अनेक शाळांमध्येही नोकरी केली आहे. तर मुलगा तिचा विद्यार्थी आहे.

ज्या कारमध्ये दोघे ओढळून आले ती कार महिलेच्या पतीची होती. तो अमेरिकेत सुरक्षा विभागात मोठा अधिकारी आहे. डेली मेलनुसार, त्यांनी महिलेवर एका विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप केला आहे. ते पत्नी आणि आपल्या तीन मुलांसोबत नेब्रास्कातील एक शहर ग्रेटनामध्ये राहतात. त्यांच्या मुलांसोबत एकाचं वय या केसमधील मुलाच्या वया इतकं आहे.

इराणवर प्रतिहल्ला करण्याआधी इस्रायलची भारताला खास चिठ्ठी, काय म्हटलय त्यात?

इराणने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर मध्य पूर्वेत तणाव वाढला आहे. इस्रायलयने भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना चिठ्ठी लिहीली आहे. इस्रायलवरील हल्ल्यानंतर आज संपूर्ण जगात इराणच्या रिवोल्यूशनरी गार्ड्स म्हणजे आयआरजीसीची ( IRGC) चर्चा आहे.

सीआयए, मोसाद, केजीबी आणि रॉ सारख्या आंतरराष्ट्रीय गुप्तचर यंत्रणांशी IRGC ची तुलना होत आहे. विशेष म्हणजे IRGC लष्कर आणि गुप्तचर संघटना दोन्ही सुद्धा नाहीय. इराणच्या आर्मीपेक्षा वेगळी ही पॅरा मिलट्री फोर्स आहे. IRGC थेट इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला खामनेई यांना रिपोर्ट करतं. वर्ष 2019 मध्ये अमेरिकेने IRGC ला दहशतवादी संघटना ठरवून त्यावर बंदी घातली. युरोपियन युनियन सुद्धा IRGC वर बंदी घालण्याच्या तयारीत आहे. IRGC कडे स्वत:ची ग्राऊंड फोर्स, नेवी आणि एअर फोर्स आहे.

इस्रायलने भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना चिठ्ठी लिहून इराणच्या IRGC म्हणजे इराण रिवॉल्यूशनी गार्ड कॉर्प्सला दहशतवादी संघटना ठरवण्याची मागणी केली आहे. याआधी 2019 मध्ये अमेरिकेने बंदी घातली. याआधी इस्रायलने भारताकडे हमासला दहशतवादी संघटना घोषित करण्याची मागणी केली होती. 1979 साली इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली. त्यानंतर IRGC ची स्थापना झाली. मध्य पूर्वेमध्ये इराणची ताकद आणि प्रभाव कायम ठेवण्याची या संघटनेवर जबाबदारी आहे. IRGC ला कुठल्याही अडथळ्याविना सहज आपल काम करता यावं, यासाठी इराणचे कायदे आणि न्यायालयापासून त्यांना वेगळं ठेवण्यात आलय. इराणचे राष्ट्रपती सुद्धा IRGC च्या कामात हस्तक्षेप करु शकत नाही.

इराणमध्ये न्यूक्लियर प्रोग्रामचा कंट्रोल कोणाकडे?

इराणच्या सैन्यापेक्षा एकदम वेगळी IRGC फोर्स आहे. अत्याधुनिक पद्धतीने ही फोर्स तयार करण्यात आलीय. त्यांच्याकडे 1,90,000 प्रशिक्षित सैन्य बळ आहे. 20 हजार नौसैनिक आहेत. इराणच्या समुद्र सीमेजवळ ते सक्रीय असतात. इराणच्या मिसाइल आणि न्यूक्लियर प्रोग्रामचा सर्व कंट्रोल IRGC च्या एअरफोर्सकडे आहे. इराणच्या अंतर्गत कुठल्याही स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी IRGC ने एक वॉलिंटियर फोर्स बनवली आहे. त्याच नाव आहे, बासिज. सहा लाख लोक बासिजमध्ये आहेत. ही एक पॅरामिलिट्री फोर्स आहे.

अजितदादा काय बोलले? ..तर द्रौपदीचा विचार करावा लागेल…

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आज बारामती, दौंड आणि इंदापूर दौऱ्यावर आहेत. अजित पवार हे डॉक्टर आणि वकिलांचा मेळावा घेणार असून इंदापूरपासून त्याची सुरुवात केलीय.

यावेळी त्यांनी डॉक्टरांचे प्रश्न समजून घेत त्यावर मार्ग काढू असं म्हटलं. पाचव्या टप्प्यापर्यंत आम्ही बिझी राहणार आहे. डॉक्टरांचे अनेक प्रश्न आहेत त्यातून मार्ग काढू असं म्हणाले. गर्भपात आणि मुलींच्या जन्मदराबाबत बोलताना अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे.

अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या बाहेरचे पवार या वक्तव्यावरून यावेळी टोला लगावला. डॉक्टरांशी बोलताना एका महिला डॉक्टरचे नाव घेत अजित पवार यांनी म्हटलं की, “तुम्ही सून म्हणून आला असला तरी आम्ही तुम्हाला बाहेरच्या म्हणणार नाही तुम्ही आमच्या लक्ष्मी आहे.”

गर्भपात आणि मुलींच्या जन्मदरावर बोलताना अजित पवार म्हणाले की, बीडमध्ये काय आणि किती प्रकार चालतात ते तुम्हाला माहितीय. पण अशा घटना घडू नये. काही जिल्ह्यात एवढी तफावत पडायला लागली की हजार मुलं ज्यावेळी जन्माला येतील साडे आठशे मुली जन्माला येत होते. सातशे नव्वदपर्यंयत हे प्रमाण आहे. भविष्यात तर सगळं अवघडच होणार आहे. पुढे काही द्रौपदीचा विचार करावा लागेल, असा प्रसंग त्यावेळी कधी येऊ शकतो. यातला गमतीचा भाग जाऊद्या. गंमत म्हणून मी त्याचा उल्लेख केला. मला कुणाचा अपमान करायचा नव्हता.

आम्ही लोकाभिमुख कामे करतो पण काही गोष्टीत आम्ही चुकू शकतो. काम करणारा चुकतो. जो कामच करीत नाही तर तो चुकेल कसा? 1991 साली नरसिंह राव यांनी मला सांगितले की अजित तुला विश्वासदर्शक ठराव झाला की तुला राजीनामा द्यायचा आहे. तुला आमदारकी लढवावी लागेल असं म्हणत अजित दादांनी त्यांच्या आमदारकीचा किस्सा सांगितला.

मी विकास करणारा माणूस आहे. मी अनेक पंतप्रधान पाहिले. मी मोदींना विरोध करीत होतो. त्यांच्या सारखा माणूस सारखा सारखा मिळत नाही. अनेक कामे त्यांनी केली. एका बाजूला नरेंद्र मोदी आणि दुसऱ्या बाजूला कोणताही चेहरा नाही, पण राहुल गांधी आपण धरू. काय चित्र दिसतं तुम्हाला? असा प्रश्नही अजित पवार यांनी विचारला.

सरकारमध्ये कामासाठी गेलो मी सत्तेला हापापले नाही. माझ्या एवढं पाच वेळा उपमुख्यमंत्री होईल असं वाटत नाही. मीच आताच्या खासदारासाठी मते मागितली. पण कोणताही केंद्राचा प्रोजेक्ट इथे आला नाही. हर्षवर्धन पाटील आमच्या महायुतीचे घटक झाले आहेत. ते आपल्याला डॉक्टरांचे प्रश्न सोडवायला मदत करतील.

माणूस खरा कुणाशी बोलतो तर डॉक्टरशी. जरा त्यांच्याशी बोला. काय चालले आहे विचारा, आमचे नाव घेतलं तर जरा चांगले बोला जर दुसरे नावं घेतलं तर जोरात इंजेक्शन द्या अशी मिश्किल टिप्पणी अजित पवार यांनी केली. वाडप्या घराचा असला की कितीही वाढता येतं. आता मी वाढपी आहे. तुम्ही मला साथ द्या मी तुम्हाला साथ देईल. आतापर्यंत खासदाराला निवडून दिले. तुम्ही आता महायुतीच्या खासदाराला निवडून दिले तर त्याची कारकीर्द आजपर्यंत जे खासदार निवडून गेले आहेत त्यांच्या पेक्षा महायुतीच हा खासदार उजवा असेल असंही अजित पवार म्हणाले.

भारतातील ‘ही’ जमात जगात सर्वाधिक खतरनाक, इथे गेलेलं कोणीच जिवंत परत येत नाही !

जगातील सर्वात धोकादायक जमात कोणती आहे? तुम्हाला माहिती आहे का? या जमातीचे लोक आजही मुख्य प्रवाहापासून आणि जगातील इतर लोकांपासून खूप दूर राहतात. त्यांच्या भागात कोणी पोहोचलं तर ते त्याला ठार मारतात.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, की ही या जमातीचे लोक भारतातील एका बेटावर राहतात. चुकूनही इथे कोणी गेला तर त्याचं जिवंत परत येणं जवळपास अशक्यच आहे.

हे लोक 30 हजार वर्षांहून अधिक काळ जगापासून अलिप्त राहत आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे बेट कुठं आहे आणि त्याचं नाव काय आहे? अंदमानचे नॉर्थ सेंटिनेल बेट जगातील सर्वात धोकादायक मानले जाते. इथे राहणाऱ्या जमातीने स्वतःला संपूर्ण जगापासून तोडलं आहे. सर्व प्रयत्न करूनही त्यांनी मुख्य प्रवाहात येण्याची तयारी दाखवली नाही. नॉर्थ सेंटिनेल बेटावर राहणाऱ्या जमातीने 2018 मध्ये ख्रिश्चन मिशनरी जॉन ॲलन चाऊ यांची हत्या केल्यावर लोकांचं लक्ष वेधलं गेलं.
जॉनने नॉर्थ सेंटिनेल बेटाचं वर्णन “पृथ्वीवरील सैतानाचा शेवटचा किल्ला” असं केलं होतं. या जमातीच्या लोकांनी यापूर्वीही त्यांच्या बेटावर पोहोचलेल्या सर्व लोकांना ठार मारलं होतं. ही एकमेव जमात आहे, ज्यांच्या जीवनात किंवा अंतर्गत बाबींमध्ये भारत सरकार हस्तक्षेप करत नाही. तसंच बाहेरील लोकांना येथे जाण्यास शासनाने बंदी घातली आहे.

अलीकडेच सापडलेल्या कागदपत्रांवरून हे दिसून येतं की सेंटिनेल बेटावर राहणारी जमात बाहेरील लोकांना आपला शत्रू का मानते. याचं खरं ते अपहरण, आजारपण असल्याचं सांगतात. उत्तर सेंटिनेल बेटावर हल्ला केला तेव्हा कॅनडात जन्मलेले वसाहती प्रशासक मॉरिस विडाल पोर्टमन हे रॉयल नेव्हीचे कमांडर होते. हा हल्ला यशस्वी झाला नसला तरी बाहेरच्या लोकांबद्दल शत्रुत्वाची भावना या जमातीत निर्माण झाली असे म्हणतात. हल्ल्यानंतर, पोर्टमनने दोन सेंटिनेलीज प्रौढ आणि चार मुलांचे अपहरण केले आणि त्यांना दक्षिण अंदमान बेटांची राजधानी पोर्ट ब्लेअर येथे नेले.

पोर्टमॅनने अपहरण केलेल्या लोकांमुळे बेटावर महामारी पसरली. असे म्हटले जाते की हजारो वर्षे बाकी जगापासून वेगळं राहणाऱ्या सेंटिनेलीजमध्ये अनेक सामान्य आजारांसोबत लढण्यासाठीची प्रतिकारशक्ती नव्हती. अशा परिस्थितीत अपहरण झालेले लोक लगेचच आजारी पडले. प्रौढ मरण पावले. मात्र, या आजारातून लहान मुलं बरी झाली. अशा स्थितीत त्यांना पुन्हा बेटावर पाठवण्यात आलं. पण त्या मुलांमध्ये आजार कायम होते, ज्यामुळे इथल्या लोकांमध्ये भयंकर महामारी पसरली. अशा परिस्थितीत, हे लोक बाहेरच्या जगापासून लांब राहण्यामागे हा अनुभव कारणीभूत असावा असा अंदाज आहे.

महाराष्ट्रातील 48 मतदारसंघामध्ये कोण जिंकणार? बघा संपूर्ण यादी

लोकसभा निवडणूक 2024 (Lok sabha Election 2024) मध्ये महाराष्ट्रातून नेमकं कोण विजय मिळवणार यावरून अनेक चर्चा सुरू आहेत. 2019 विधानसभा निवणडुकीनंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं ही बदलली आहेत.

दरम्यान, एबीपी सी-व्होटरने नुकताच त्यांचा नवा ओपिनियन पोल जाहीर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी 48 मतदारसंघात नेमकं कोण जिंकू शकतं याबाबत अंदाज वर्तवला आहे. (abp c voter opinion poll who can win in maharashtra 48 constituencies see full list lok sabha election 2024)

शिवसेना (UBT) काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार हे तीनही पक्ष महाराष्ट्रात महाविकास आघाडी म्हणून भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या एनडीएला टक्कर देत आहेत. यावेळी सहा महत्त्वाचे पक्ष आमनेसामने असल्याने नेमकं कोण बाजी मारणार याचा अंदाज लावणं काहीसं कठीण आहे. पण याचबाबत एबीपी सी व्होटरने 48 जागांबाबतचा सर्व्हे आता समोर आणला आहे. आपल्या या ओपिनियन पोलमध्ये त्यांनी उमेदवारांनुसार अंदाज वर्तवला आहे.

Opinion Poll नुसार महाराष्ट्रातील 48 मतदारसंघामध्ये कोणाची होणार सरशी?

1. रामटेक (चुरशीची लढत)
राजू पारवे – शिवेसना (शिंदे गट) – आघाडीवर
श्यामकुमार बर्वे – काँग्रेस – पिछाडीवर

2. नागपूर (सोपा विजय)
नितीन गडकरी – भाजप – आघाडीवर
विकास ठाकरे – काँग्रेस – पिछाडीवर

3. वर्धा (चुरशीची लढत)
रामदास तडस – भाजप – आघाडीवर
अमर काळे – राष्ट्रवादी (शरद पवार) – पिछाडीवर

4. अमरावती (सोपा विजय)
नवनीत राणा – भाजप – आघाडीवर
बळवंत वानखेडे – काँग्रेस – पिछाडीवर

5. अकोला (सोपा विजय)
अनुप धोत्रे – भाजप – आघाडीवर
अभय पाटील – काँग्रेस – पिछाडीवर
प्रकाश आंबेडकर – वंचित – पिछाडीवर

6. बुलढाणा (चुरशीची लढत)
प्रतापराव जाधव – शिवसेना (शिंदे गट) – पिछाडीवर
नरेंद्र खेडेकर – शिवसेना (ठाकरे गट) – आघाडीवर

7. भंडारा-गोंदिया (चुरशीची लढत)
सुनील मेंढे – भाजप – आघाडीवर
प्रशांत पडोळे – काँग्रेस – पिछाडीवर

8. गडचिरोली-चिमूर (चुरशीची लढत)
अशोक नेते – भाजप – पिछाडीवर
नामदेव किरसान – काँग्रेस – आघाडीवर

9. चंद्रपूर (चुरशीची लढत)
सुधीर मुनगंटीवार – भाजप – आघाडीवर
प्रतिभा धानोरकर – काँग्रेस – पिछाडीवर

10. यवतमाळ-वाशिम (चुरशीची लढत)
राजश्री पाटील – शिवसेना (शिंदे गट) – पिछाडीवर
संजय देशमुख – शिवसेना (ठाकरे गट) – आघाडीवर

11. हिंगोली (चुरशीची लढत)
बाबूराव कोहळीकर -शिवसेना (शिंदे गट) – पिछाडीवर
नागेश पाटील-आष्टीकर – शिवसेना (ठाकरे गट) – आघाडीवर

12. नांदेड (चुरशीची लढत)
प्रतापराव चिखलीकर – भाजप – पिछाडीवर
वसंतराव चव्हाण – काँग्रेस – आघाडीवर

13. परभणी (सोपा विजय)
महादेव जानकर – रासप – पिछाडीवर
संजय जाधव – शिवसेना (ठाकरे गट) – आघाडीवर

13. परभणी (सोपा विजय)
महादेव जानकर – रासप – पिछाडीवर
संजय जाधव – शिवसेना (ठाकरे गट) – आघाडीवर

14. जालना (सोपा विजय)
रावसाहेब दानवे – भाजप – आघाडीवर
कल्याण काळे – काँग्रेस – पिछाडीवर

15. औरंगाबाद (चुरशीची लढत)
चंद्रकांत खैरे – शिवसेना (ठाकरे गट) – आघाडीवर
इम्तियाज जलील – एमआयएम – पिछाडीवर
अद्याप महायुतीचा उमेदवार जाहीर नाही

16. बीड (चुरशीची लढत)
पंकजा मुंडे – भाजप – आघाडीवर
बजरंग सोनावणे – राष्ट्रवादी (शरद पवार) – पिछाडीवर

17. धाराशिव (सोपा विजय)
अर्जना पाटील – राष्ट्रवादी (अजित पवार) – पिछाडीवर
ओमराजे निंबाळकर – शिवसेना (शिंदे गट) – आघाडीवर

18. लातूर (सोपा विजय)
सुधाकर श्रृंगारे – भाजप – आघाडीवर
शिवाजीराव काळगे – काँग्रेस – पिछाडीवर

19. पुणे (सोपा विजय)
मुरलीधर मोहोळ – भाजप – आघाडीवर
रवींद्र धंगेकर – काँग्रेस – पिछाडीवर
वसंत मोरे – वंचित – पिछाडीवर

20. बारामती (चुरशीची लढत)
सुप्रिया सुळे – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – आघाडीवर
सुनेत्रा पवार – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – पिछाडीवर

21. शिरूर (सोपा विजय)
अमोल कोल्हे – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – आघाडीवर
शिवाजीराव आढळराव – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – पिछाडीवर

22. मावळ (सोपा विजय)
श्रीरंग बारणे -शिवसेना (शिंदे गट) – आघाडीवर
संजोग वाघेरे – शिवसेना (ठाकरे गट) – पिछाडीवर

23. सोलापूर (चुरशीची लढत)
राम सातपुते – भाजप – आघाडीवर
प्रणिती शिंदे – काँग्रेस – पिछाडीवर

24. माढा (सोपा विजय)
रणजीतसिंह निंबाळकर – भाजप – पिछाडीवर
धैर्यशील मोहिते-पाटील – राष्ट्रवादी (शरद पवार) – आघाडीवर

25. सांगली (चुरशीची लढत)
संजयकाका पाटील – भाजप – आघाडीवर
चंद्रहार पाटील – शिवेसना (ठाकरे गट) – पिछाडीवर
विशाल पाटील – अपक्ष – पिछाडीवर

26. सातारा (चुरशीची लढत)
उदयनराजे भोसले – भाजप – पिछाडीवर
शशिकांत शिंदे – राष्ट्रवादी (शरद पवार) – आघाडीवर

27. कोल्हापूर (चुरशीची लढत)
संजय मंडलिक – शिवसेना (शिंदे गट) – आघाडीवर
शाहू महाराज छत्रपती – काँग्रेस – पिछाडीवर

28. हातकणंगले (चुरशीची लढत)
धैर्यशील माने – शिवसेना (शिंदे गट) – पिछाडीवर
सत्यजीत पाटील शिवसेना (ठाकरे गट) – आघाडीवर
राजू शेट्टी – स्वाभिमानी – पिछाडीवर

29. नंदूरबार (चुरशीची लढत)
हिना गावित – भाजप – पिछाडीवर
गोवाल पाडवी – काँग्रेस – आघाडीवर

30. धुळे (चुरशीची लढत)
सुभाष भामरे – भाजप – आघाडीवर
शोभा बच्छाव – काँग्रेस – पिछाडीवर

31. जळगाव (सोपा विजय)
स्मिता वाघ – भाजप – आघाडी (विजय)
करण पवार – शिवसेना (UBT) – पिछाडी (पराभव)

32. रावेर (सोपा विजय)
रक्षा खडसे – भाजप आघाडीवर (विजय)
श्रीराम पाटील – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) – पिछाडीवर (पराभव)

33. दिंडोरी (चुरशीची लढत)
भारती पवार – भाजप – आघाडीवर
भास्कर भगरे – राष्ट्रवादी (शरद पवार) – पिछाडीवर

34. नाशिक (चुरशीची लढत)
राजाभाऊ वाजे – शिवसेना (ठाकरे गट) – पिछाडीवर
महायुती उमेदवार जाहीर नाही – (महायुतीचा उमेदवार आघाडी घेऊ शकतो)

35. अहमदनगर (चुरशीची लढत)
सुजय विखे-पाटील – भाजप – पिछाडीवर
निलेश लंके – राष्ट्रवादी (शरद पवार) – आघाडीवर

36. शिर्डी (चुरशीची लढत)
सदाशिव लोखंडे – शिवेसना (शिंदे गट) – पिछाडीवर
भाऊसाहेब वाघचौरे – शिवसेना (ठाकरे गट) – आघाडीवर

37. पालघर (सोपा विजय)
भारत कामडी – शिवसेना (ठाकरे गट) – पिछाडीवर
महायुती उमेदवार जाहीर नाही – (महायुतीचा उमेदवार आघाडी घेऊ शकतो)

38. भिवंडी (चुरशीची लढत)
कपिल पाटील – भाजप – पिछाडीवर
सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे – राष्ट्रवादी (शरद पवार) – आघाडीवर

39. कल्याण (सोपा विजय)
श्रीकांत शिंदे – शिवेसना (शिंदे गट) – आघाडीवर
वैशाली दरेकर – शिवसेना (ठाकरे गट) – पिछाडीवर

40. ठाणे (चुरशीची लढत)
राजन विचारे – शिवसेना (ठाकरे गट) – पिछाडीवर
महायुती उमेदवार जाहीर नाही – (महायुतीचा उमेदवार

41. उत्तर मुंबई (सोपा विजय)
पियूष गोयल – भाजप – आघाडीवर
महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर नाही – पिछाडीवर

42. उत्तर-पश्चिम मुंबई (सोपा विजय)
अमोल किर्तीकर – शिवसेना (ठाकरे गट) – पिछाडीवर
महायुती उमेदवार जाहीर नाही – (महायुतीचा उमेदवार आघाडी घेऊ शकतो)

43. उत्तर-पूर्व (ईशान्य मुंबई) (चुरशीची लढत)
मिहीर कोटेचा – भाजप – आघाडीवर
संजय दिना पाटील – शिवसेना (ठाकरे गट) – पिछाडीवर

44. उत्तर-मध्य मुंबई (सोपा विजय)
महायुती उमेदवार जाहीर नाही – (महायुतीचा उमेदवार आघाडी घेऊ शकतो
महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर नाही – पिछाडीवर

45. दक्षिण-मध्य मुंबई (सोपा विजय)
राहुल शेवाळे – शिवसेना (शिंदे गट) – आघाडीवर
अनिल देसाई – शिवसेना (ठाकरे गट) – पिछाडीवर

46. दक्षिण मुंबई (चुरशीची लढत)
अरविंद सावंत – शिवसेना (ठाकरे गट) – पिछाडीवर
महायुती उमेदवार जाहीर नाही – (महायुतीचा उमेदवार आघाडी घेऊ शकतो

47. रायगड (चुरशीची लढत)
सुनील तटकरे – राष्ट्रवादी (अजित पवार) – पिछाडीवर
अनंत गीते – शिवेसना (ठाकरे गट) – आघाडीवर

48. रत्नागिरी-सिंधुदुर्ग (सोपा विजय)
विनायक राऊत – शिवसेना (ठाकरे गट) – पिछाडीवर
महायुती उमेदवार जाहीर नाही -(महायुतीचा उमेदवार आघाडी घेऊ शकतो)