Pune: पालकमंत्री चंद्रकांत पाटीलच १५ ऑगस्टला करणार ध्वजवंदन; अजित पवार कोल्हापुरला

0
100
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

पुणे :पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जाणार याची गेल्या महिन्याभरापासून जोरदार चर्चा होती. परंतु, सध्या तरी पालकमंत्री चंद्रकांत पाटीलच राहणार असल्याचे शासनाकडून निश्चित करण्यात आले आहे.

पालकमंत्र्यांच्या हस्ते १५ ऑगस्टला ध्वजवदंन करण्यात येते. स्वातंत्र्यदिनाचा ध्वजवंदन जिल्हा मुख्यालयात कोण करणार याची यादी जाहीर करण्यात आली आहेत. त्यात पुण्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव जाहीर झाले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोल्हापूरात ध्वजारोहण होणार आहे. दिलीप वळसे पाटील – वाशिम, हसन मुश्रीफ -सोलापूर, धनंजय मुंडे – बीड, छगन भुजबळ – अमरावती, अनिल पाटील -बुलढाणा, अदिती तटकरे – पालघर, धर्मराव आत्राम – गडचिरोली, संजय बनसोडे – लातूर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात येणार आहे.

शिवसेना व भाजपच्या मंत्र्यांकडे एका पेक्षा अधिक जिल्ह्यांची जबाबदारी होती. ती आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याकडे पालकमंत्री म्हणून दिली जाण्याची शक्यता आहे. सध्या तरी ध्वजवंदनाची जबाबदारी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here