शिरवळ, 22 फेब्रुवारी: रविवारी खंडाळा (Khandala) तालुक्याच्या शिरवळ (Shirwal) येथील एका इमारतीच्या टेरेसवर पुण्यातील (Pune) मटका (Mataka) व्यावसायिकाची निर्घृण हत्या (Brutal murder) केल्याची घटना उघडकीस आली होती. अज्ञात मारेकऱ्यानं डोक्यात गोळी झाडून हत्या (Shot dead) केल्याचं प्रथमदर्शनी समोर आलं होतं.मृत मटका किंगच्या खिशातील हॉटेलच्या बिलावरून (Hotel Bill) शिरवळ पोलिसांनी हत्येचं गूढ उलगडलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. आर्थिक कारणातून ही हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. संजय सुभाष पाटोळे असं हत्या झालेल्या 36 वर्षीय मटका व्यावसायिकाचं नाव आहे.
ते पुण्यातील बिबवेवाडी परिसरातील रहिवासी होते. तर तरबेज मेहमूद सुतार (वय-31, कात्रज, पुणे), किरण बबनराव साळुंखे (आंबेगाव), विकी राजेंद्र जाधव (वानवडी), शंकर उर्फ तात्या आश्रुबा पारवे (बिबवेवाडी), नितीश उर्फ नित्या सतीश पतंगे (बिबवेवाडी) आणि राकेश सुरेश गायकवाड (पुणे) असं अटक केलेल्या सहा आरोपींची नावं आहेत. पुण्यातील विविध भागातून सर्व आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. सर्व आरोपींना शिरवळ याठिकाणी आणण्यात आलं असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.
10 वर्षांनी लहान मुलावर विवाहितेचं जडलं प्रेम, पळवून नेत केलं धक्कादायक कृत्य मृत संजय पाटोळे आणि मुख्य सूत्रधार आरोपी यांच्यात पैशांची देवाण-घेवाण आणि जमिनीच्या कारणातून वाद सुरू होता. दोघंही एकमेकांना जीवे मारण्याची धमकी देत होते. याच कारणातून आरोपी तरबेज यानं आपल्या साथीदारांच्या मदतीने पाटोळे यांची हत्या केली आहे. आरोपींनी पाटोळे यांच्या डोक्यात गोळी झाडून हत्या केली आहे.
पण शवविच्छेदन अहवालात मृताच्या डोक्यात गोळी आढळली नाही. संबंधित गोळी मृताच्या नाकातून आरपार निघून बाजूच्याच एका ओढ्यात पडली असावी, असा संशय पोलिसांना आहे. महिलेने प्रायव्हेट पार्टमध्ये लपवले 16 कोटींचे ड्रग्स; काढायला लागले 2 दिवस असं उलगडलं गूढ… रविवारी शिरवळ येथील एका इमारतीच्या टेरसवर संजय पाटोळे यांचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळला होता. घटनेची माहिती मिळताच शिरवळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
यावेळी पंचनामा करत असताना पोलिसांना मृताच्या खिशात एका हॉटेलच्या बिलाची पावती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित हॉटेलमध्ये जाऊन सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. यावेळी मृत संजय याच्यासोबत काही आरोपी जेवण करताना आढळून आले. यातील एक आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचंही पोलिसांना समजलं. त्यानुसार पोलिसांनी पुण्यातील विविध भागातून सर्व आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास शिरवळ पोलीस करत आहेत.