
पुणे – अल्पवयीन मुलीसच पळवून नेऊन तीच्यावर अत्याचार करणाऱ्या सराईत गुन्हेगारास भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुध्द पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सनि सोमनाथ सिंह (रा.आंबेगाव बुद्रुक) असे अटक आरोपीचे नाव आहे.
त्याने दिनांक 2 फेब्रुवारी 2022 रोजी परिचयाच्या असलेल्या एका अल्पवयीन मुलीस पळवून नेले. यानंतर तीच्यावर शारीरीक अत्याचार केले. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर मुलीचा शोध सुरु करण्यात आला होता. मात्र आरोपीने मोबाईल बंद ठेवल्याने त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता.
दरम्यान, पोलीस कर्मचारी धनाजी धोत्रे व शिवदत्त गायकवाड यांना खबर मिळाली त्यानूसार आरोपीचा ठावठिकाणा शोधण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे व त्यांचे पथकाने आरोपी सनिला अटक केली आहे. सनी हा कोणतेही काम धंदे करत नसून त्याला गांजाचे व्यसन आहे. त्याच्या ताब्यातून मुलीची सुटका केल्यावर तीच्यावर अत्याचार झाल्याचे उघड झाले.
ही कारवाई पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक, संगिता यादव, विजय पुराणिक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक नितीन शिंदे, अंमलदार पोलीस हवालदार रविंद्र चिप्पा, पोलीस नाईक सचिन पवार, गणेश काळे, विक्रम सांवत, आशिष गायकवाड, धनाजी धोत्रे, सचिन गाडे व शिवदत्त गायकवाड यांचे पथकाने केली आहे.