पीएमपीएमएल बसखाली (PMPML Bus Accident) येऊन वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना


पुणे : पीएमपीएमएल बसखाली (PMPML Bus Accident) येऊन वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना समोर आली आहे.
बसच्या चाकाखाली आल्यामुळे महिलेला प्राण गमवावे लागले. पुण्यात (Pune Crime) हा दुर्दैवी अपघात झाला. पादचारी महिला रस्ता ओलांडत असताना ही घटना घडली. यामध्ये 75 वर्षीय महिलेचा मृत्यू (Old Lady Death) झाला. पद्मा पंढरीनाथ गायकवाड असं मयत महिलेचं नाव आहे. पुण्यातील विश्रांतवाडी येथील मुकुंदराव आंबेडकर चौकात हा प्रकार घडला. विश्रांतवाडी चौकाकडून भोसरीकडे पीएमपीएलएम बसच्या मागील चाकाखाली त्या आल्या होत्या. त्यानंतर बससोबत काही अंतर त्या फरफटत गेल्या. त्यामुळे जागीच त्यांचा करुण अंत झाला. या प्रकरण संबंधित पीएमपीएमएल बसचा चालक आणि वाहक या दोघांना बससह विश्रांतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

काय आहे प्रकरण?

पीएमपीएमएल बसखाली चिरडून वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. बसच्या मागील चाकाखाली आल्यामुळे वृद्धा काही अंतर फरफटत गेली. या अपघातात पद्मा पंढरीनाथ गायकवाड या 75 वर्षीय ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला.

नेमकं काय घडलं?

पद्मा गायकवाड रस्ता ओलांडत असताना हा अपघात झाला. विश्रांतवाडी चौकाकडून भोसरीकडे जाणाऱ्या बसच्या मागील चाकाखाली त्या आल्या. त्यामुळे जागीच त्यांचा करुण अंत झाला. मुकुंदराव आंबेडकर चौकात हा प्रकार घडला.

बस चालक-वाहक ताब्यात

अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. अपघात प्रकरणी संबंधित बसचा चालक, वाहक यांना बससह विश्रांतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here