पीएमपीच्या 11 हजार कर्मचाऱ्यांना अखेर सातवा वेतन आयोग मंजूर


:पुणे – निवडणुकांच्या तोंडावर पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांना महापालिकेने खूशखबर दिली आहे. पीएमपीच्या 11 हजार कर्मचाऱ्यांना अखेर सातवा वेतन आयोग मंजूर करण्यात आला असून, त्यानुसार वाढणारे वेतन देण्यासाठी पुणे महापालिका महिन्याला 6 कोटी, तर पिंपरी-चिंचवड महापालिका 4 कोटी रुपये देणार आहे.
या कर्मचाऱ्यांना वेतनवाढीचा फरक पुढील पाच वर्षांत देण्यात येणार असून त्यासाठी पुणे महापालिका आपल्या हिश्‍श्‍याची 261 कोटी 76 लाख रुपयांची रक्कम पुढील पाच वर्षांत समान हप्त्याने देणार आहे. ही रक्कम पीएमपीला दरवर्षी दिल्या जाणाऱ्या संचलन तुटीतून वसूल केली जाणार आहे. स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी ही माहिती दिली.

पीएमपीएमएल संस्थेला संचलन तुटीमुळे होणारा खर्च सन 2013-14 पासून महापालिकेच्या स्वामित्व हिश्‍शानुसार (60 टक्के) दिला जातो. त्यानुसार गेल्या आर्थिक वर्षातील संचलन तूट या वर्षात दरमहा 20 कोटी रुपये याप्रमाणे पीएमपीएमएलला दिली जात आहे.
करोना काळामुळे पीएमपीएमएलचे उत्पन्न कमी झाले आहे. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. महामंडळाचे संचलन विस्कळीत होऊ नये म्हणून पुणे महापालिकेकडून 88 कोटी रुपयांची अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here