गुंडाची मोठी दहशत

नागपूर : अक्षय चामडा नावाचा कळमना परिसरातील (Kalmana Premises) गुंड आहे. त्याची हा भागात मोठी दहशत आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.कही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलावर (Minor) अनैसर्गिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली. त्याला अटक झाल्याचं कळताच परिसरातील नागरिक सुद्धा आता त्याच्या विरोधात तक्रारी द्यायला समोर यायला लागलेत. त्यातच आणखी एक प्रकरण पुढे आलं. एका अल्पवयीन मुलाला या गुंडाने 100 रुपये दारू पिण्यासाठी मागितले. मात्र त्याने देण्यास नकार दिला. त्यामुळे गुंडाने त्याच्या वाडिलाला जीवंत मारण्याची धमकी (Death Threat) दिली. धमकीला घाबरून त्याने 100 रुपये दिले. अशाप्रकारे तो लहान मुलांमध्ये आपली दहशत पसरवत होता. त्यामुळं परिसरातील मुलं त्याला घाबरायचे.

वडिलांनी दिली तक्रार

याविषयी अल्पवयीन मुलाने वडिलांना सांगितले असता त्याच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी त्या गुंडावर गुन्हा दाखल केला. आरोपीवर 10 पेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद आहे, अशी माहिती कळमना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी दिली. या गुंडाची मोठी दहशत परिसरात आहे. त्यामुळं नागरिक त्याला घाबरत होते. मात्र आता त्याला अटक झाली. त्यामुळं नागरिक त्याच्या विरोधात तक्रारी देत आहेत. आता न्यायालयाने गुंडाला पंचेवीस फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत. पोलीस आता त्याच्यावर कठोर कारवाई करण्याच्या विचारात आहेत. अक्षयने परिसरात लहान मुलांवर दहशत निर्माण केली आहे. वडिलाला जीवानिशी मारण्याची धमकी देऊन मुलांकडून दारू पिण्यासाठी 100 रुपयांची खंडणी मागणाऱ्या कुख्यात गुंडाविरोधात गुन्हा दाखल केलाय. अक्षय चामडा नामक या गुंडाला कळमना पोलिसांनी आधीच अटक केली. त्याच्यावर 10 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here