अल्पवयीन भाच्यासोबत ( Minor Boy ) नको ते प्रकार

नागपूर : लैंगिक संबंधांची पातळी कुठल्या थराला जाईल, याचा नेम राहिलेला नाही. यातच नातेसंबंधांचीही चिरफाड होताना दिसत आहे. नात्याने मामी लागणाऱ्या तरुणीने अल्पवयीन भाच्यासोबत ( Minor Boy ) नको ते प्रकार केल्याचं उघडकीस आलं आहे मामीनेच आपल्या भाच्याचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी (Nagpur Crime) येथे ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे आरोपी मामीचे वय अवघे 21 वर्ष आहे. तर पीडिता भाचा केवळ 16 वर्षांचा आहे. या प्रकरणी आरोपी मामीच्या विरुद्ध पारशिवनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मामीने भाच्यासोबत केलेल्या लैंगिक छळाचे व्हिडीओ चित्रीकरण (Obscene Video) केल्याचाही दावा केला जात आहे. ही व्हिडीओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत मामी लैंगिक शोषण करत असल्याचंही बोललं जात आहे.

काय आहे प्रकरण?

मामीनेच आपल्या भाच्याचे लैंगिक शोषण केल्याचा खळबळजनक आरोप होत आहे. नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी भागात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरोपी मामीच्या विरुद्ध पारशिवनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मामीच्या कृत्यामुळे मामी-भाच्यासारख्या पवित्र नात्याला काळिमा फासल्याचं बोललं जात आहे.

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

21 वर्षीय मामीने सोळा वर्षीय भाच्याचे अनेक वेळा लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. मामीने भाच्याच्या लैंगिक छळ करतानाचे दृश्य कॅमेरामध्ये कैद केले होते. त्यानंतर हे व्हिडीओ चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत महिला लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप होत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here