नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थमंत्री म्हणून आपला चौथा 2022 चा अर्थसंकल्प सादर केला.सीतारामन यांनी देशातील पायाभूत सुविधांसाठी यावेळी मोठ्या घोषणा केल्या. यंदाच्या अर्थसंकल्पात २०४७ पर्यंतची रुपरेषा असल्याचं सांगत ‘पीएम गतिशक्ती योजने’च्या ‘मास्टर प्लान’वर सरकार काम करत असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. गतिशक्ती योजनेअंतर्गत रस्ते, रेल्वे, जलवाहतुकीसाठी येत्या काळात मोठी गुंतवणूक केली जाणार आहे. पण देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासात राज्य सरकारांनी देखील पुढाकार घेऊन सहभाग घेणं आवश्यक असल्याचंही सीतारामण म्हणाल्या. cheaper and costlier in budget 2022
अर्थव्यवस्थेचा सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होत असतो. त्यामुळेच, यंदाच्या बजेटमध्ये सर्वसामान्यांना काय मिळालं, काय स्वस्त झालं आणि काय महागलं याची चर्चा होत असते. त्यामुळे, यंदाच्या बजेटमध्ये काय स्वस्त झालं, काय महाग झालं हे खालीलप्रमाणे पाहता येईल.
स्वस्त
कपडे, चामड्याचा वस्तू
इलेक्ट्रॉनिक्स वस्तू
मोबाईल फोन, चार्जर
हिऱ्याच्या वस्तू, दागिने
शेतीची अवजारे
कॅमेरा लेन्सेस स्वस्त होणार
विदेशातून येणाऱ्या मशिन्स
चप्पल आणि बुट्स
इंधन स्वस्त होण्याची शक्यता
इम्पोर्टेड केमिकल स्वस्त होणारमहाग
छत्र्या महाग होणार
क्रिप्टो करन्सीमधील गुंतवणूक महागबजेट हायलाइट्स
निर्मला सीतारामन म्हणाल्या, 2014 पासून आमचे सरकार गरिबी आणि उपेक्षित जीवन जगणाऱ्या लोकांना सक्षम बनवण्यात गुंतले आहे.
‘देश कोरोना लाटेशी झुंज देत आहे. पण आपली अर्थव्यवस्था तेजीत आहे.
‘येत्या आर्थिक वर्षात भारताची आर्थिक वाढ 9.2% राहण्याचा अंदाज आहे’.
LIC चा IPO लवकरच अपेक्षित आहे.
25 वर्षाचा पायाभूत अर्थसंकल्प
60 लाख नवीन रोजगार निर्माण होतील.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी ही योजना पीपीपी पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे.
1 वर्षात 25000 किमी महामार्ग, महामार्ग विस्तारासाठी 20 हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत.
8 नवीन रोपवे बांधले जातील
3 वर्षात 400 नवीन पिढीच्या वंदे भारत ट्रेन चालवल्या जातील.
तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी सरकार काम करेल
5 नद्या जोडल्या जातील.
2023 हे भरड धान्याचे वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे
सेंद्रिय शेतीवर सरकारचा भर.
शेतकऱ्यांना डिजिटल सेवा मिळणार आहे.
सिंचन, पिण्याच्या पाण्याची सुविधा वाढवण्यावर भर
लहान शेतकरी आणि उद्योगांसाठी रेल्वे कार्यक्षम लॉजिस्टिक विकसित करेल. स्थानिक उत्पादनांची पुरवठा साखळी वाढवण्यासाठी
‘एक स्टेशन, एक उत्पादन’ योजना सुरू केली जाईल.
गंगा नदीच्या काठावर 5 किमी रुंद कॉरिडॉरमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीवर लक्ष केंद्रित करून रासायनिक मुक्त नैसर्गिक शेतीला देशभर
प्रोत्साहन दिले जाईल.
100 PM गती शक्ती कार्गो टर्मिनल पुढील 3 वर्षांत विकसित केले जाईल.