पालकमंत्रीपदाचा वाद, ध्वजारोहणाची यादी दुसऱ्यांदा बदलली, पुणे शहरात ना अजित पवार, ना चंद्रकांत पाटील, मग कोण?

0
90
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

मुंबई : राज्यात तीन पक्षाचे सरकार आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन पक्षांचे सरकार आहे. भाजप, शिवसेना सरकार असताना मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नव्हता.

अर्थात शिवसेनेत मंत्रिपदासाठी इच्छुकांची संख्या अधिक होती, हे कारण आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सरकारमध्ये आला. अजित पवार यांच्यासह नऊ जण मंत्री झाले. परंतु वादामुळे पालकमंत्रीपदाचे वाटप केले गेले नाही. आता हाच वाद ध्वजारोहण समारंभाला बसला आहे. त्यामुळे १५ ऑगस्टच्या ध्वजारोहणाची यादी दोन वेळा बदलली आहे.

पुणे, रायगडचा वाद

पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी अजित पवार इच्छुक आहेत. परंतु हा जिल्हा भाजपला हवा आहे. तोच वाद रायगडसाठी आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेना आमदार भरत गोगावले आपला वारंवार दावा करत आहेत. यामुळे १५ ऑगस्टसाठी ध्वजारोहणाची यादी तयार केली गेली. त्यात रायगडला जिल्हाधिकारी ध्वजारोहण करणार होते. पुणे शहरात चंद्रकांत पाटील ध्वजारोहण करणार होते.

पुन्हा यादी बदलली

पालकमंत्रीपदाचा वाद टाळण्यासाठी दुसऱ्यांदा यादी बदलली. जुन्या यादीनुसार पुणे येथे चंद्राकांत पाटील ध्वजारोहण करणार होते. आता नवीन यादीनुसार चंद्रकांत पाटील रायगडमध्ये ध्वजारोहण करणार आहेत.
पुण्यात राज्यपाल रमेश बैस ध्वजारोहण करणार आहे. यामुळे पुण्यात ना चंद्रकांत पाटील ना अजित पवार असा तोडगा काढला गेला आहे.

अजित पवार कुठे करणार

अमरावतीत छगन भुजबळ ध्वजारोहण करणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीकडून सुचवले गेले. परंतु हा निर्णय कायम राहिला. अजित पवार आता कोल्हापुरात ध्वजारोहण करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here