World Cup 2023 ची तिकिटे पुणेकरांना ‘या’ तारखेपासून उपलब्ध, ICC कडून मोठी घोषणा!

0
74
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

मुंबई : वर्ल्ड कप 2023 ला अगदी काही महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यासाठी बीसीसीआय सर्व तयारी करत असल्याचं दिसत आहे. सर्व स्टेडियमही वर्ल्ड कपच्या थरारासाठी सज्ज झाले आहेत. यंदा ऑक्टोबरमध्ये वर्ल्ड कप असल्याने देशभरात अनेक सण असल्याने काही तारखांमध्ये बदल केला गेला आहे.

अशातच आयसीसीने आज तिकिटांच्या विक्रीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यातील पुण्यातील मैदानावर होणाऱ्या सामन्यांची तारीख दिली आहे.

पुणेकरांना कधीपासून तिकिटे उपलब्ध :-

पुण्यातील एमसीए मैदानावर पाच सामने खेळवण्यात येणार आहेत. या मैदानावर पहिलाच सामना 19 ऑक्टोबर रोजी भारत वि. बांगलादेश होणार आहे. आयसीसीने सांगितल्यानुसार टीम इंडियाच्या सामन्यांची तिकिटे 31 ऑगस्टपासून उपलब्ध होणार आहे. तर टीम इंडियाचे सामने सोडून इतर देशांच्या सामन्यांची तिकिटे 25 ऑगस्टपासून सर्वांना मिळणार आहेत.

पुण्यातील MCA मैदानावर होणारे सामने

भारत विरुद्ध बांगलादेश, 19 ऑक्टोबर रोजी
अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका, 30 ऑक्टोबर रोजी
न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 1 नोव्हेंबर रोजी
इंग्लंड विरुद्ध नेदरलँड, 8 नोव्हेंबर रोजी
ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश, 12 नोव्हेंबर रोजी

गुवाहाटी आणि त्रिवेद्र इथे होणाऱ्या सामन्यांची तिकिटे 30 ऑगस्टपासून बुक करता येणार आहेत. 31 ऑगस्टपासून चेन्नई, दिल्ली आणि पुण्यामध्ये होणऱ्या सामन्यांची तिकिटे बुक करता येणार आहेत. तर 2 सप्टेंबरपासून बेंगळुरू आणि कोलकाता येथे होणाऱ्या सामन्यांचे बुकिंग चाहत्यांना करता येईल. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमध्ये होणाऱ्या सामन्यांची तिकिटे 3 सप्टेंबरपासून बुक करता येणार आहेत.

या स्टेडियमला लागली आग

कोलकातामधील ईडन गार्डन या स्टेडियममध्ये बुधवारी 11. 50 च्या सुमारास आग लागली होती. या आगीमध्ये संपूर्ण ड्रेसिंग रूम जळून खाक झालं आहे. ड्रेसिंग रूममध्ये ठेवलेलं बरेचसं सामानही आगीमध्ये जळालं आहे. अग्निशमन विभागातील जवानांना आग आटोक्यात आणण्यासाठी जवळपास एक तास लागला. ही आग आणखी वाढत गेली असती मात्र वेळीच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here