Kangana Ranaut | स्वत:बद्दल ‘गुगल’वर सर्च केल्यानंतर कंगना रनौत नाराज; म्हणाली “माझ्याबद्दल हे सर्व..”

0
96
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

मुंबई : बॉलिवूडची ‘क्वीन’ अर्थात अभिनेत्री कंगना रनौतनेहमीच तिच्या बेधडक वक्तव्यांसाठी चर्चेत असते. मोकळेपणे बोलणाऱ्या कंगनाला अनेकदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो.

मात्र टीकाकारांना न जुमानता ती सोशल मीडियावर बिनधास्तपणे व्यक्त होते. कंगनाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये नुकतीच एक पोस्ट लिहिली आहे. तिच्या या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. कंगनाने या पोस्टद्वारे तिच्याबद्दल ‘गुगल’ या सर्च इंजिनवर दाखवल्या जाणाऱ्या माहितीवर आक्षेप घेतला आहे. इतर कलाकारांविषयी जेव्हा गुगलवर सर्च केलं जातं, तेव्हा त्यांच्या कामाविषयी माहिती दिसते, मात्र स्वत:विषयी केलं तर वेगळंच काहीतरी दिसतं, असं तिने या पोस्टमध्ये म्हटलंय.

 

कंगनाची पोस्ट-

 

‘दुसऱ्या अभिनेत्रींच्या गुगल पेजेसवर त्यांच्या कामाबद्दल, आगामी प्रोजेक्ट्सबद्दलची माहिती दिसते आणि माझ्या (अभिनेत्री, लेखिका, दिग्दर्शिक, निर्माती असूनही) गुगल पेजवर दहा वर्षांपूर्वी कोणी काय म्हटलं होतं किंवा दहा वर्षांपूर्वी मी केलेल्या वक्तव्याचा काय अर्थ आहे हे सर्व दिसतंय. हाहाहाहा.. एवढंच, आजच्या दिवसाची हीच स्टोरी आहे,’ असं तिने लिहिलं आहे.

 

 

 

कंगना सोशल मीडियावर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. एखादा राजकीय, सामाजिक मुद्दा असो किंवा सोशल मीडियावर व्हायरल होणारी एखादी पोस्ट.. कंगना त्यावर आवर्जून बिनधास्तपणे व्यक्त होते. काही दिवसांपूर्वीच 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रिवॉल्वर रानी’ या कंगनाच्या चित्रपटातील किसिंग सीनच्या वृत्ताबद्दलची पोस्ट चर्चेत आली होती.

 

कंगनाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये हे वृत्त शेअर करत त्यावर आपली प्रतिक्रिया दिली होती. त्या वृत्तात असं लिहिलं होतं की, ‘रिवॉल्वर रानी’ या चित्रपटातील किसिंग सीनदरम्यान वीर दासच्या ओठांतून रक्त येऊ लागलं होतं. कंगना आणि वीर दास यांच्यातील हा किसिंग सीन होता. त्यावर प्रतिक्रिया देताना कंगनाने लिहिलं होतं, ‘हृतिक रोशननंतर मी बिचाऱ्या वीर दासची अब्रू लुटली. हे कधी झालं?’ यासोबतच तिने हसण्याचा इमोजी पोस्ट केला होता.

 

कंगना रनौत आणि हृतिक रोशन यांच्यातील वाद जगजाहीर आहे. 2016 – 2017 मध्ये हा वाद जोरदार चर्चेत होता. इतकंच नव्हे तर कंगनाविरोधात हृतिकने कोर्टात धाव घेतली होती. त्यावेळी प्रत्येक मुलाखतीत कंगना यावर बोलली होती. केवळ बोललीच नाही तर हृतिकबद्दल मनात असलेला सगळा राग तिने या मुलाखतींमध्ये व्यक्त केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here