प्रेयसीचा गळा आवळून ठार केल्याची घटना

आरोपीला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास एपीएमसी पोलीस करत आहे.

मुंबई : लॉजमध्ये बोलावून प्रियकराने प्रेयसीचा गळा आवळून ठार केल्याची घटना नवी मुंबईतील तुर्भे येथे उघडकीस आली आहे.
या प्रकरणी आरोपी प्रियकराला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

नवी मुंबईतील तुर्भे येथील साई प्रणव लाॅजवर एक कपल आलं होतं. रात्री त्याच्यामध्ये भांडणे मोठी चालू होते. याबाबत लाॅजमालकाने पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच एपीएमसी पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तपास केला असता त्या लॉजमधील रूममध्ये महिला बेशुद्ध अवस्थेत आढळली. त्या महिलेला लगेचच रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिचा मृत्यू झाल्याची माहिती रूग्णलयाने दिली. तर, तिच्या सोबत आलेल्या तरुणाला पळून जात असताना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता आपणच तिचा गळा आवळून मारल्याचे कबूल त्याने केल. खडकपाडा कल्याण येथे वास्तव्यास असनारा हा युवकाचे मृत महिलेसोबत मागील पाच वर्षापासून प्रेमसंबंध होते अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान आरोपीला न्यायालयात हजर केले असता आरोपीस पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास एपीएमसी पोलीस करत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here