सोने आणि चांदीच्या दरात वाढ

मुंबई : Gold Silver Price Today | मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) बदल होताना दिसत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आजही सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. आज (शुक्रवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 45,800 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 62,700 रुपये पर्यंत ट्रेड करत आहे.

भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचं दिसून येत होतं. मात्र सध्या सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. गतवर्षी सोन्याचा दर पन्नास हजाराच्या आत होता. सध्याही सोन्याचा दर पन्नास हजाराच्या आत आहे. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी ग्राहकांसाठी योग्य संधी आहे. (Gold Silver Price Today)

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

आजचा सोन्याचा भाव –

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,760 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,900 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,760 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,900 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,800 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,970 रुपये

आजचा चांदीचा भाव – 62,700 रुपये (प्रति किलो)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here