दक्षिण मुंबईतल्या मलबार हिल आणि गिरगाव चौपाटीवर दोन अज्ञात व्यक्तींचे मृतदेह सापडले आहेत. मलबार हिल व डी. बी. मार्ग पोलीस मृतदेहांची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रियदर्शिनी पार्कच्या मागील बाजूला असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर मंगळवारी सकाळी 8.30 वाजता 35 ते 40 वयोगटातील अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला. तर गिरगाव चौपाटीवरदेखील मध्यरात्री अंदाजे 50 वयोगटातील अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला. काही तासांच्या अंतराने तसेच लागूनच असलेल्या समुद्रकिनाऱ्यांवर अज्ञात मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.