पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे हैराण झालेल्या ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी

मुंबई  इंधन दरवाढीचा ग्राहकांवर कितीही परिणाम झाला तरी पर्याय नसल्याने ते खरेदी करावेच लागते. मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे हैराण झालेल्या ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे.तुम्ही तुमच्या मोटारसायकल आणि स्कूटरमध्ये इलेक्ट्रिक किट रिट्रोफिट करून घेता येणार आहे. त्यामुळे पेट्रोलचा खर्च निम्म्याने होण्याची शक्यता आहे. हे किट बसविण्याचा खर्चही जास्त नाही.

दुचाकी वाहनांमध्ये तुमच्याकडे हिरो स्प्लेंडरसारखी दुचाकी आणि होंडा अॅक्टिव्हासारखी स्कूटर असेल तर या वाहनांना इलेक्ट्रिक दुचाकीत रूपांतरित करू शकणार आहात. यासाठी सध्या देशाच्या विविध भागात स्टार्टअप्स आहेत. या स्टार्टअपच्या माध्यमातून दुचाकीमध्ये इलेक्ट्रिक किट रिट्रोफिटिंग करण्याचे काम करतात. यामध्ये Zuink, GoGoA1 आणि Bounce सारख्या कंपन्यांची नावे प्रसिद्ध आहेत. या कंपन्या मोटारसायकलचे इंजिन आणि गिअरबॉक्स बदलतात आणि वाहनात इलेक्ट्रिक मोटार बसवतात.

इलेक्ट्रिक मोटार किट पाहण्यासाठी तुम्ही गुगल केले तर कमी किमतींचे इलेक्ट्रिक मोटार किट दिसून येतील. परंतु अशा किटना सरकारची मान्यता नसल्याने तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मोटार वाहन कायद्याच्या कलम ५२ नुसार वाहनांमध्ये नोंदणी व्यतिरिक्त कोणतेही रेट्रोफिटिंग बदल करायचे असल्यास आरटीओ मान्यताप्राप्त इलेक्ट्रिक किट घेणे योग्य राहील.

पेट्रोल स्कूटरला इलेक्ट्रिक बनवण्यासाठी मोटारसायकलपेक्षा कमी खर्च येतो. याचे कारण म्हणजे स्कूटरला चांगली बूट स्पेस आहे. त्यामुळे किट बसविण्याची किंमत कमी होते. आरटीओने मंजूर केलेल्या रेट्रोफिट इलेक्ट्रिक मोटारची किंमत १५ ते २० हजार पर्यंत असते. परंतु श्रेणी आणि ऊर्जेच्या हिशेबानुसार बॅटरीची किंमत वेगळी द्यावी लागेल. ही एक वेळचीच किंमत असून, एक बॅटरी तीन वर्षांच्या वॉरंटीसह मिळते. काही कंपन्या स्वॅप करण्यायोग्य बॅटरी भाड्याने देतात. Zuink किट स्वॅप करण्यायोग्य बॅटरीसह मिळते. ही कंपनी बंगळुरूमध्ये सेवा देते. त्यांचे किट २७ हजार रुपयांना मिळते. ८९९ रुपये प्रति महिना हप्त्यावरही ती घेतली जाऊ शकते. GoGoA1 या बॅटरीची किंमत ३५ हजार रुपये आहे. यामध्ये बॅटरीची किंमत आणि जीएसटी वेगळा द्यावा लागणार आहे. हे किट लावल्यानंतर एका चार्जनंतर दुचाकी १५१ किमीपर्यंत धावू शकते, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here