5.3 C
New York
Friday, March 29, 2024

Buy now

दर्पण दिनानिमित्त तलवाडा पोलीस स्टेशनकडून पत्रकारांचा सत्कार

- Advertisement -

बीड : गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस स्टेशन येथे जेष्ठ पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त दर्पण दिन साजरा केला जातो त्या निमित्ताने तलवाडा पोलीस ठाण्यात पोलिसांच्या वतीने पत्रकारांचा पेन व डायरी देऊन सत्कार करण्यात आला.

- Advertisement -

याबाबत माहिती अशी की पत्रकारितेचे जनक ,पत्रमहर्षी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती दर्पण दिन म्हणून करण्यात येते तसेच पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो यानिमित्ताने आज दि 6 जानेवारी गुरुवार रोजी तलवाडा पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे यांनी तलवाडा सर्कलमधील झुंजार नेताचे गेवराई प्रतिनिधी सुभाष शिंदे,पार्श्वभुमिचे बापु गाडोकर,लोकमंथन विष्णु राठोड,अशोक सुरासे,अतिकभाई,डॉ.गांधलेसर्व ,अल्ताफ कुरेशि,जातेगावचे काकडे,वाघमारेपत्रकार व सिरसदेवी येथील पोलीस न्यूज चे पत्रकार शाम अडागळे यांचा सत्कार पेन व डायरी भेट देऊन सत्कार करण्यात आला.तर या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते आर .आर.आबा,सिंगने टेलर,नाटकर महराज आदी होते.
तसेच ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे यांना यमाई गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्त्यांचा सत्कार सर्व पत्रकारांनी केला व शुभेच्छा दिल्या. यावेळी नव्याने रुजू झालेले उपनिरीक्षक मानेसर, बाबासाहेब भवर यांचाही सत्कार करण्यात आला व सर्व पत्रकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
गेवराई तालुक्यात प्रथमच पत्रकार दिनानिमित्त तलवाडा पोलीस ठाण्यात पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.मागील काही वर्षांत आजपर्यंत कुठल्याही तालुक्यातील पोलिस ठाण्यात पत्रकारांचा सत्कार पत्रकार दिनानिमित्त केला नाही परंतु आज तलवाडा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष , दबंग अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे यांनी या उपक्रमाची सुरुवात करून आज दर्पण दिनानिमित्त सर्व पत्रकारांचा भेट वस्तू देऊन सत्कार केला यामुळे सर्व पत्रकारांनी नवघरे साहेबाचे आभार मानले तसेच या उपक्रमा बद्दल तलवाडा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे .

- Advertisement -

Related Articles

Latest Articles