9.5 C
New York
Saturday, April 20, 2024

Buy now

जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन

- Advertisement -

बीड : बीड जिल्ह्य़ातील महिलांच्या स्वतंत्र स्वच्छतागृहे, मुलींचा घटता जन्मदर, नोंदणी व प्रसुति आकडेवारीत तफावत तसेच कायदा व सुव्यवस्था ढासळल्याने असुरक्षिततेचे वातावरण ,सामाजिक महिला कार्यकर्त्यांवर राजकीय दबाव, सॅनिटरी नॅपकीनचा तुटवडा, कोविड दरम्यान कुटुबप्रमुखाच्या मृत्युनंतर बालसंगोपण योजनेंतर्गत लाभ न मिळणे आदि आरोग्य विषयक समस्या, अल्पवयीन मेघा आटोळेचा कोविड लसीकरण दरम्यान वैद्यकीय आधिकारी-शालेय व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे मृत्युप्रकरणात गुन्हे दाखल करण्यात यावेत यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक आक्रोश आंदोलन करण्यात आले. आंदोलनात शेख युनुस,मोहम्मद मोईज्जोदीन,शेख मुबीन, नितिन सोनावणे, डाॅ.संजय तांदळे, अड. संगीता धसे, संजीवनी राऊत, किस्किंदा पांचाळ,माजी सैनिक अशोक येडे, रामधन जमाले, सादेक सय्यद, शिवाजी आटुळे आदि सहभागी होते, निवेदन जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री, महिला व बालकल्याण मंत्री, आरोग्य मंत्री, अध्यक्ष महिला आयोग महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले.

- Advertisement -

कायदा व सुव्यवस्था ढासळली, महिला असुरक्षित:-अड.संगीता धसे
____
बीड शहरातील कायदा व सुव्यवस्था पुर्णपणे ढासळली असुन महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढले असुन पोलीस प्रशासनातील आधिकारी पीडीत महिलांच्या केसेस दाखल करण्यास जाणीवपुर्वक टाळाटाळ करत असल्यामुळे गुन्हेगारांचे मनोधैर्य वाढले असुन गुन्ह्याचा वाढता आलेख चिंतेची बाब असून महिलांवरील अत्याचार प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी आंदोलनाची वेळ यावी ही दुर्दैवी बाब असून भविष्यात हा अन्याय सहन केला जाणार नाही.

- Advertisement -

निष्काळजीपणामुळू मेघाच्या मृत्युप्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा:-शिवाजी आटोळे
______
माझी मुलगी मेघाचे १५ वर्ष वय नसताना तसेच तिला एसएलई आजार असल्याचे शालेय व्यवस्थापनाला लस देऊ नका असे कळवुन सुद्धा मुलीला लस घेतली नाहीतर परिक्षेला बसु दिले जाणार नाही असा धाक दाखवून दिलेल्या कोविड लसीकरण दरम्यान माझी मुलगी मेघा ईयत्ता नववीत शिकत होती, लसीकरणानंतर तिची तब्येत खालावली आणि त्यातच तिचा बळी गेला, वैद्यकीय-आधिकारी, शालेय व्यवस्थापनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.

भ्रष्टाचार दडपण्यासाठी राजकीय दबाव, पदाचा दुरूपयोग:-किस्कींदा पांचाळ
_____
महिला बचतगटामार्फत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्यांनी लेखी तक्रार केल्यानंतर राजकीय पदाधिकारी यांनी महिला आयोग सदस्यपदाचा महिलांना न्याय देण्याऐवजी दडपशाहीचा वापर करत दैनिकात दिशाभूल करून बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात असून महिला आयोग सदस्य पदावरून हटवण्यात यावे.

मुलींचा मृत्युदर; नोंदणी व प्रसुती दरम्यान तफावत, सॅनिटरी नॅपकीनचा तुटवटा आरोग्य विभागाचे दुर्लक्ष
___
बीड जिल्ह्य़ातील मुलींचा जन्मदर कमी असल्याचे पीसीपीएनडीटी कायदा १९९४ च्या राज्य पर्यवेक्षक मंडळाच्या अशासकीय सदस्या डाॅ.आशा मिरगे यांनी पत्रकार परीषदेत जाहीर करत कोरोना कालावधीत आरोग्य विभागाचे सोनोग्राफी सेंटर कडे दुर्लक्ष झाल्याचे नमुद केले होते त्याच दरम्यान जिल्ह्य़ातील नोंदणी व प्रसुतिच्या आकडेवारीत मोठ्याप्रमाणात तफावत असुन गर्भवती मातानोंदणी ४८,८३८ आणि एकुण प्रसुतिची संख्या ४५,४१५ असुन एकुण ३००० गर्भांची तफावत असुन आरोग्य विभागातील आधिका-यांकडुन जाणीवपुर्वक दुर्लक्ष होत असून संबधित प्रकरणात उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करण्यात यावी.तसेच वर्षभरापासुन सॅनिटरी नॅपकीनचा असलेला तुटवडा दुर करण्यात येऊन किशोरवयीन मुलींचे आरोग्य धोक्यात असून तात्काळ उपाययोजना करण्यात यावी. तसेच बीड शहरातील नगररोड वरील शासकीय कार्यालयासमोर महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे बांधण्यात यावीत.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles