ताज्या बातम्या

लता मंगेशकर यांच्या तब्येतीबाबत अफवा , प्रक्रती स्थिर


गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. या अफवांमधून लता मंगेशकर यांची प्रकृती खालावल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समोर येत आहे.

काही दिवसांपूर्वी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली. मात्र त्यांची प्रकृती स्थिर असून, त्या अजूनही ICU मध्ये आहेत. लता मंगेशकर यांच्या प्रवक्त्यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत पसरणाऱ्या अफवांचे खंडन केले आहे. याशिवाय चाहत्यांना ‘कोणत्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय अफवा पसरु नका’, असे आवाहन करण्यात आले आहे.

लता मंगेशकर मुंबईच्या ब्रीच कॅंडी हॉस्पीटलमध्ये अ‍ॅडमीट आहेत. लता मंगेशकर यांना जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना 9 जानेवारीला हॉस्पीटलमध्ये अ‍ॅडमीट करण्यात आले होते.वयाच्या 92 व्या वर्षी त्यांना कोरोनासोबतच न्यूमोनियाचाही आजार झाला आहे. लता मंगेशकर यांच्या तब्येतीबद्दल अपडेट देत, त्यांच्या टीमने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात चाहत्यांना मेगास्टारबद्दलच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. अलीकडेच लता मंगेशकर यांच्य प्रकृतीबाबत अपडेट्स देत डॉक्टरांनी सांगितेल की, त्यांना 10 ते 12 दिवसात रुग्णालयात ठेवण्यात येईल, जेणेकरुन त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली चांगले उपचार होऊ शकतील.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *