एका महिलेनं आपल्या पतीची निर्घृण हत्या

नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

गडहिंग्लज, 21 जानेवारी: कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्याच्या गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव (Bhadgaon) याठिकाणी एका महिलेनं आपल्या पतीची निर्घृण हत्या (husband’s brutal murder by wife) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
आरोपी महिलेनं झोपेत असणाऱ्या आपल्या अपंग पतीच्या डोक्यात दगड (Crushed head with stone) घालून अमानुषपणे संपवलं आहे. हा हल्ला इतका भयंकर होता की, पतीचा जागीच तडफडून मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक (Accused wife arrested) केली असून तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

शीतल गजानन गाडवी असं हत्या झालेल्या अपंग पतीचं नाव आहे. तर गायत्री शीतल गाडवी असं अटक केलेल्या 42 वर्षीय पत्नीचं नाव आहे. मृत शीतल हे मूळचे गडहिंग्लज येथील रहिवासी असून सध्या ते भडगाव याठिकाणी आपली पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्याला होते. मृत शीतल यांना दारुचं व्यसन होतं.

त्याचबरोबर त्यांना अर्धांगवायूने देखील ग्रासलं होतं. त्यामुळे घराशेजारी एका पत्र्याच्या शेडमध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. संसाराचं स्वप्न भंगलं! नवऱ्याला झोपेच्या गोळ्या देऊन नव विवाहिता फरार… दरम्यान, दारुच्या व्यसनामुळे शीतल आणि गायत्री यांच्यात सतत वाद होत होता.

घटनेच्या दिवशी देखील दोघा पती पत्नीमध्ये वाद झाला होता. यावेळी मृत शीतल हा कॉटवर झोपलेला असताना, दारूच्या नशेत अश्लील शब्दांत पत्नी गायत्री यांना शिव्या देत होता. यावेळी संतापलेल्या गायत्री यांनी रागाच्या भरात शीतल यांच्या डोक्यात थेट दगड घातला. हा हल्ला इतका भयावह होता की, शीतल जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडले.

यावेळी गायत्री यांनी घाबरलेल्या अवस्थेत रुग्णवाहिका बोलवली. गर्भवती महिला वनरक्षकाला मारहाण प्रकरण,माजी सरपंचाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. उपचारापूर्वीच शीतल यांचा तडफडून मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी पत्नीला अटक केली आहे. तसेच पोलिसांनी रक्ताने माखलेला दगड ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीची चौकशी केली असता, तिने गुन्ह्याच्या कबुली दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here