8.3 C
New York
Thursday, March 28, 2024

Buy now

दारुच्या नशेत बकऱ्याचा बळी देण्याऐवजी एका व्यक्तीचाच बळी

- Advertisement -

आंध्र प्रदेशमधील चित्तूर जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. दारुच्या नशेत येथे एका व्यक्तीने बकऱ्याचा बळी देण्याऐवजी एका व्यक्तीचाच बळी दिलाय. पोलिसांनी या प्रकरणामध्ये आरोपीला अटक केली असून प्रकरणाचा सखोल तपास सुरु केलाय.ही घटना १६ जानेवारी रोजी घडलीय. संक्रांतीच्या उत्सवादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या बकऱ्यांचा बळी देण्याच्या कार्यक्रमादरम्यान मंदिराच्या बाजूलाच ही घटना घडल्याचं सांगितलं जातं आहे.

- Advertisement -

इंडिया टूडेने दिलेल्या वृत्तानुसार चलापती नावाच्या एका व्यक्तीला मंदिरात बकऱ्याचा बळी द्यायचा होता. मात्र बऱ्याचा बळी देण्यासाठी चलापति जेव्हा मंदिरात आला तेव्हा तो दारुच्या नशेत होते. पूजा झाल्यानंतर बळी देण्याची वेळ आली तेव्हा चलापतिने दारुच्या नशेत बकरा पकडून बसलेल्या सुरेश नावाच्या व्यक्तीचाच गळ्यावर तलावर ठेवली. इतरांनी चलापतिला रोखण्याआधीच त्याने सुरेशच्या मानेवरुन तलवार फिरवली होती.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles