9.5 C
New York
Saturday, April 20, 2024

Buy now

बीड शाळा-महाविद्यालये नियम व अटींसह सुरू कराव्यात ; स्कुल चले हम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

- Advertisement -

शाळा-महाविद्यालये नियम व अटींसह सुरू कराव्यात ; स्कुल चले हम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन ,
___
बीड : सतत शाळा बंद असल्यामुळे विदयार्थ्यांचे बौद्धिक, शारिरीक आणि मानसिक खच्चीकरण होत असून भावीपिढी दिशाहीन होण्याची शक्यता शिक्षण क्षेत्रात काम करणा-या तज्ञांनी व्यक्त केली असून विषाणु संसर्ग नसताना देखील ग्रामिण भागातील सरसकट शाळा बंद करण्याचा शासनाचा निर्णय शिक्षणाच्या व विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टिकोणातुन चुकीचा ठरत असल्याचे मत पालकांचे असुन शाळा बंद या निर्णयाचा फेरविचार करून शासनाच्या कोरोना विषयक अटी व नियमांचे पालन करून शाळा-महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी जोर धरत आहे, यामुळेच सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, शिक्षण हक्क आधिकार क्षेत्रात काम करणारे मनोज जाधव यांच्या पुढाकाराने उद्या दि.१७ जानेवारी सोमवार रोजी जिल्हाधिकारी बीड कार्यालयासमोर “स्कुल चले हम आंदोलन “पुकारण्यात आले असून कोरोना नियम व अटींसह सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आंदोलनात हनुमंत भोसले, महासचिव (राज्यसचिव)महाराष्ट्र पीटीए, युनुस च-हाटकर भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड, प्रा. राऊत ज्ञानेश्वर, सामाजिक कार्यकर्ते संदिप जाधव, मोहम्मद मोईज्जोदीन, सय्यद आबेद ,शेख मुबीन, हनुमान मुळीक, जिल्हाध्यक्ष शिवबा संघटना, विजय पवार, अड. संगीता धसे, डाॅ.कविता गुंड आदि सहभागी होते.

- Advertisement -

ऑनलाइन शिक्षण पद्धती ग्रामिण भागातील विद्यार्थी पालकांना डोकेदुखीच
___
शासनाचा ऑनलाइन शिक्षण पद्धती अंगीकारण्याचा ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षण पद्धतीवर सकारात्मक परीणाम दिसुन येत नसुन आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्याकडे अन्ड्राईड मोबाइल नसणे अथवा रेंज नसल्यामुळेच शैक्षणिक नुकसान होत असून शिक्षणाचा खेळखंडोबा झाल्याचे निदर्शनास येत आहे त्यामुळेच शासनाने ईतर ठीकाणी ५० टक्के क्षमतेचे लावलेले निकष शाळा महाविद्यालयांना देऊन परवानगी देण्यात यावी.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles