आई बाजारात गेली , घरात सिलेंडरचा स्फोट , बापलेकांचा झाला कोळसा !

 

सिंधुदुर्ग : वेंगुर्ला वायंगणी बागायतवाडी मध्ये आज सकाळी ही घटना घडली. वडील वसंत गणेश फटनाईक (वय 70) व मुलगा गणेश वसंत फटनाईक (वय 29) असं मृत्यू झाल्याच्या बापलेकांचं नाव आहे. वसंत गणेश फटनाईक याच्या राहत्या घरी आज सकाळी अचानत सिलेंडरचा स्फोट झाला.

अचानक झालेल्या या स्फोटानंतर घराला आग लागली. घरात असलेल्या वसंत फटनाईक आणि मुलगा गणेश फटनाईक यांना बाहेर पडता आले नाही. त्यामुळे दोघेही बापलेक आगीच्या भक्षस्थानी सापडले. (पुण्यात बिर्याणीवरुन जोरदार राडा; टिक्का भाजण्याच्या सळईने हल्ला, आला समोर) घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वेंगुर्ला नगर परिषद अग्निशमन बंब व कुडाळ एम आयडीसी अग्निशमन दलाने धाव घेतली.

तसंच स्थानिकांनीही आग विझवण्यात मदत केली. पण, फटनाईक बापलेकांना वाचवता आले नाही. वसंत फटनाईक यांची पत्नी मनीषा वसंत फटनाईक या सकाळीच मासेविक्रीसाठी बाजारात गेल्या होत्या. त्यामुळे त्या या दुर्घटनेतून बचावल्या आहे.

पण पती आणि मुलाच्या मृत्यूमुळे त्यांच्यावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर घटनास्थळी पोलीस, तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here