बीड देवस्थानच्या 405 एकर जमिनीचा गैरव्यवहार , अपजिल्हाधिकारी निलंबीत

नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

बीड : जिल्ह्यात देवस्थान आणि वक्फच्या ४०५ एकर जमिनीमध्ये मोठ्याप्रमाणावर गोंधळ झाला आहे. यासंदर्भात आष्टी तालुक्यात ३ गुन्हे दाखल असून बीडच्या शिवाजीनगर पोलिसात एक गुन्हा दाखल आहे. यात भूसुधार विभागाचा तत्कालीन उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव याचा आरोपी म्हणून समावेश करण्यात आलेला आहे. दरम्यान हे गुन्हे दाखल होण्यापूर्वीच भूसुधार च्या जमीन खालसा प्रकरणात प्रकाश आघाव याने अनियमितता केल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी आणि विभागीय आयुक्तांनी शासनास दिला होता. या सर्व पार्श्वभूमीवर उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव याला निलंबित करण्यात आले आहे. राज्यशासनाने आज हे आदेश काढले आहेत. जमीन घोटाळा प्रकरणातील ही पहिलीच मोठी कारवाई आहे.

नेमकं प्रकरण काय?

बीड शहरातील प्रसिद्ध शहेनशाहवली दर्ग्याला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला. दर्ग्याची तब्बल ४०५ एक्कर जमीन बनावट दस्तऐवज बनवून, महसूलमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताने भूमाफियांनी लाटली आहे. याप्रकरणी बीडमधील महसूलच्या उपजिल्हाधिकारी या सह १५ जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे पुन्हा एकदा महसूल मधील भूमाफियांचे रॅकेट उघड झाले.

या सर्व घडामोडीनंतर अखेर प्रकाश आघाव पाटील याच्या निलंबनाचे आदेश राज्य शासनाने काढले असून त्याच्यावर जमीन खालसा प्रकरणात अनियमितता केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आलीय. दरम्यान, बीड जिल्ह्यातील हजारो एक्कर जमिनी भूखंड माफियांनी आपल्या घशात घातली असून याची देखील चौकशी होऊन कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

या जमिनीची किंमत कोट्यवधीच्या घरात असून या जमिनीमधून राष्ट्रीय महामार्ग गेल्याने, तब्बल १५ कोटी रुपयांचा मावेजा शासन दरबारी पडून आहे. त्यामुळं आरोपी भूमाफियांनी हा मावेजा उचलण्यासाठी नामी शक्कल लढवली असल्याचं तक्रारीत म्हटले आहे. यासंदर्भात मूळ तक्रार सादेक बाबामिया इनामदार यांनी केली होती. दोषींवर कारवाई कायदेशीर कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली. या प्रकरणी महसूलमधील बड्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल झाले होते. आष्टी तालुक्यात ३ गुन्हे दाखल झाले असतांना ४ था गुन्हा देखील दाखल आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here