चौफेर व्यक्तिमत्त्व डॉ. सौ. मनोरमा दिलीप खेडकर

नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

भालगाव येथील परिवर्तन प्रतिष्ठानच्या माध्यमातून सरपंच डॉ. सौ. मनोरमा खेडकर ह्या मागील सहा वर्षांपासून भालगाव आणि परिसरामधे विविध सामाजिक कार्य करत आहेत. यामध्ये झाडे लावणे व ती जगवणे , माथा ते पायथा पाणी आडवणे आणि ते जिरवणे, कोवीड सेंटर चालवणे , निराधार मुलांच्या शिक्षणासाठी मदत करणे अशा कामाचा समावेश होतो. मागील सहा वर्षांत परिवर्तन प्रतिष्ठानने भालगाव,मुंगुसवाडे,खरवंडी, मिडसांगवी, मोहज देवढे, हनुमान गढ, तुळजवाडी इत्यादी ठिकाणी हजारो झाडे लावून ती जगवली आहेत. खरवंडी, मुंगुसवाडे,मोहज देवढे या ठिकाणी कोवीड सेंटर, रुग्णवाहिका सुरू करून शेकडो कोवीड पेशंटला मदत केली. भालगांव आणि खरवंडी येथील निराधार मुलांना शिक्षणासाठी मदत केली . या शिवाय परिवर्तन प्रतिष्ठान च्या अध्यक्षा असलेल्या डॉ. मनोरमा खेडकर यांचे भालगाव च्या सरपंच म्हणून केलेले काम संपुर्ण तालुक्यात कौतुकास्पद ठरत आहे.


परिवर्तन प्रतिष्ठानने मागील महिन्यांपासून महीला सबलीकरणासाठी भालगाव गटात गावोगावी महीला मेळावे घेण्यास सुरवात केली असुन नुकतेच भालगाव, दैत्य नांदुर, मोहज देवढे येथे महीला स्वयंसहायता समुह म्हणजे बचतगटातील महीलाचे मेळावे पार पडले . नुकताच दिनांक १०/०१/२०२२ रोजी येळी येथे येळी,बडेवाडी, बोंदरवाडी येथील महिलांसाठी परिवर्तन प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तथा भालगाव सरपंच आणि भाजपा तालुका अध्यक्ष तथा परिवर्तन प्रतिष्ठान चे सचिव माणिक खेडकर यानी महीला मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात गावातील २९ बचत गटाच्या महिलांनी तसेच ज्यांना बचत गट स्थापन करायचे आहेत, अशा शेकडो महीलांनी सहभाग घेतला होता. या मेळाव्याचा मुख्य उद्देश हा महिला बचत गटाच्या माध्यमातून येळी गावातील महीलांचे सबलीकरण करणे हा होता. सध्या येळी गावातील महिला बचतगटामार्फत अनेक उत्पादने तयार केली जातात, परंतु या तयार केलेल्या मालाला योग्य ती बाजार पेठ उपलब्ध होत नसल्याने बचत गटामार्फत तयार केलेल्या मालाच्या उत्पादनास मर्यादा येत आहेत. याचा विचार करून परिवर्तन प्रतिष्ठान मार्फत या गावातील महिला बचतगटासाठी उत्पादन विक्रीव्यवस्थापन, शेळी पालन प्रोत्साहन आणि बचतगट स्थापनेस उत्तेजन अशा तीन योजना सादर करण्यात आल्या . पहील्या योजनेत सर्व बचत गटाच्या उत्पादनांच्या विक्रीची हमी प्रतिष्ठानने घेतली , दुस-या योजनेत विविध बचत गटातील महिलांना शेळी वाटप करण्यात आले. यामधे येळेश्वर बचतगटच्या रंजना गर्जे, मातोश्री बचतगटच्या संगीता गर्जे, शिवमल्हार बचतगटच्या शकुंतला ढोले , शिवशक्ती बचतगटच्या कांता पालवे,कविता फुंदे, हरिओम बचतगटच्या योगिता कराड,भोलेशंकर बचतगटच्या सुमन जगताप, शनेश्वर बचतगटच्या अल्का जायभाये, गुरुदत्त बचतगटच्या गंगुबाई फुदे, स्वप्नसाकार बचतगटच्या सुरेखा सारूख, भगवान बाबा बचतगटच्या मनीषा ढोले , समवृध्दी बचतगटच्या मंदा ढोले, महात्मा बचतगटच्या सीमा ढोले , एकता बचतगटच्या कल्पना ढोले , विघ्नहर्ता बचतगटच्या शांताबाई कराड ,नवसंजीवनी बचतगटच्या सुमन कराड , जय झोंटिग बचतगट च्या सुमन कदम, शिवशक्ती बचतगटच्या चंद्रकला ढाकणे, भैरवनाथ बचतगट च्या मंदा ढमाले , ज्ञानदीप बचतगटच्या अशा बडे ,सावित्रीबाई बचतगट च्या हिराबाई जगताप , साईबाबा बचतगटच्या संगीता जायभाये , आदर्श बचतगटच्या लक्ष्मी बडे, सुप्रियाताई बचतगटच्या संगीता ढोले , राजदीप बचतगटच्या सिंधुताई पालवे, शेतकरी बचतगटच्या इंदुबाई दौंड, येळेश्वर बचतगटच्या कांताबाई पालवे,
तर तिस-या योजनेत ज्या महिला अद्याप बचत गटात सामील झाल्या नाहीत त्यांना बचतगट स्थापन करण्यासाठी उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आले. त्यामध्ये निर्मला बडे, मंदा बडे, कांताबाई बडे , उषा ढोले , वैशाली खेडकर, द्वारकाबाई घुले, इंदुबाई कराड, मनिषा कराड, आशा ढोले,उज्ज्वला ढोले ,वैष्णवी गर्जे यांना बक्षिसे प्राप्त झाली. तसेच प्रतिष्ठानमार्फत येळेश्वर देवस्थान विकासासाठी ५१,००० रूपये देणगी देण्यात आली.
अशा विविध प्रकारच्या सामाजिक उपक्रमाद्वारे लोकांमध्ये जागृती करण्यासाठी सातत्याने पुढाकार घेणाऱ्या भालगावच्या सरपंच डॉ. सौ. मनोरमा खेडकर म्हणजे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व. त्यांना त्यांचे पती प्रदूषण विभागीय आयुक्त दिलीप खेडकर यांची खंबीर साथ मिळाली आहे. परिवर्तन प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून सातत्याने लोकांसाठी काम करण्याचा ध्यास घेऊन विकासाची दिशा असणारे अभ्यासू व्यक्तिमत्व डॉ. मनोरमा खेडकर ह्या भालगाव आणि भालगाव परिसरातील नागरिकांसाठी मोलाचे कार्य करत आहेत.
नुकत्याच झालेला महिला मेळावा हा आमदार मोनिकाताई राजळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार होता. परंतु त्यांची तब्येत ठिक नसल्याने वृध्देश्वर साखर कारखान्याच्या संचालिका सिंधुताई जायभाये यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या मेळाव्यासाठी प्रदुषण नियंत्रण विभागिय आयुक्त दिलीप खेडकर,येळेश्वर देवस्थान चे मंहत ह.भ.प. रामगिरी महाराज, परिवर्तन प्रतिष्ठान च्या अध्यक्षा तथा भालगाव लोकनियुक्त सरपंच डाॅ. सौ. मनोरमा खेडकर, भाजपा तालुकाध्यक्ष तथा परिवर्तन प्रतिष्ठानचे सचिव माणिकराव खेडकर, येळी सरपंच सौ. शुभांगी जगताप, सोसायटी चेअरमन महादेव जायभाये ,माजी जि. प.सदस्य विठ्ठल खेडकर, भाजपा अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष रसिद तांबोळी, भगवानबाबा विद्यालयाचे पर्यवेक्षक वसंत खेडकर, पञकार दादासाहेब खेडकर,महादेव बटुळे, डॉ. दराडे ,तुकाराम खेडकर, संजय बेद्रे, रावसाहेब खेडकर, तुकाराम केदार, सुरेश चव्हाण, मनोज खेडकर, बाळराजे खेडकर, प्रकाश बडे तसेच महीलामध्ये बचत गट प्रभाग अध्यक्षा पार्वती खेडकर, परिवर्तन प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष वैशाली खेडकर, दिपा खेडकर समन्वयक अर्चना खेडकर, सुरेखा खेडकर, हिरकणी लोकसंचालित साधन केंद्राच्या सौ. माळवे ,ज्योतीताई दराडे, मंगल बडे, पुष्पा कराड आदी महिलांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here