हिंदु देवस्थान इनाम जमिन गैरव्यवहार प्रकरणात विभागीय आयुक्त, धर्मादाय आयुक्त, जिल्हाप्रशासन, पोलीस प्रशासन गोट्या खेळतंय का ?

नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

हिंदु देवस्थान इनाम जमिन गैरव्यवहार प्रकरणात विभागीय आयुक्त, धर्मादाय आयुक्त, जिल्हाप्रशासन, पोलीस प्रशासन गोट्या खेळतंय का? – डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर


बीड : जिल्ह्य़ातील हिंदु देवस्थान इनाम जमिन गैरव्यवहार प्रकरणात विभागीय आयुक्त कार्यालय, धर्मादाय आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय, महसुल व पोलीस प्रशासनातील आधिकारी गुन्हे दाखल करण्यास जाणीवपुर्वक टाळाटाळ करत असून टाईमपास करत असून सामाजिक कार्यकर्ते वर्षभरापासुन निवेदन, आंदोलनानंतर सुद्धा गुन्हे दाखल न केल्यामुळे वरील विभागातील आधिकारी गोट्या खेळत आहेत काय असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोट्या खेळो आंदोलनादवारे विचारण्यात आला असून आंदोलनात भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर, सामाजिक कार्यकर्ते संदिप जाधव, मोहम्मद मोईज्जोदीन, सय्यद आबेद, शेख मुबीन बीडकर, गणपत गिरी,रोहीदास सौदा आदि सहभागी झाले होते.

नायब तहसीलदार महसुल जिल्हाधिकारी कार्यालय मनिषा लटपटे यांना निवेदन देण्यात आले

उपायुक्त पराग सोमण यांचे जिल्हाधिका-यांना चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश

डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या दि. ८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलनानंतर उपआयुक्त( महसुल )विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांनी जिल्हाधिकारी बीड यांना बीड जिल्ह्य़ातील हिंदु देवस्थान जमिन गैरव्यवहार प्रकरणात महसुल प्रशासनातील आधिकारी भुमाफियांची पाठराखण करत महसुल व वनविभाग मंत्रालय तसेच विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्या आदेशाची अवमानना करत बेकायदेशीर हस्तांतरण प्रकरणात गुन्हे दाखल करण्यास जाणीवपुर्वक टाळाटाळ केल्याबद्दल कारवाई करण्यात यावी या मागणीनंतर संबधित प्रकरणात सविस्तर चौकशी करून अहवाल तात्काळ कार्यालयास सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
बीड तालुक्यातील नामलगाव येथिल आशापुरक देवस्थान, पालवण येथिल श्रीरामचंद्र देवस्थान, खडकीघाट येथिल रामचंद्र देवस्थान, खापरपांगरी येथिल तसेच नेकनुर येथील गोसावी मठ तसेच आष्टी तालुक्यातील खडकत येथील विठोबा देवस्थान, पांढरी येथील विठोबा देवस्थान, मुर्शदपुर येथील विठोबा खडा देवस्थान, कोयाळ येथिल रामचंद्र देवस्थान, बेलगाव येथील खंडोबा देवस्थान, चिखली येथिल रामचंद्र देवस्थान, चिंचपुर येथील श्रीरामचंद्र देवस्थान, दादेगाव येथिल श्रीराम देवस्थान, धारूर तालुक्यातील बालाजी मंदिर देवस्थान, अंबाजोगाई येथील थोरले दत्तात्रेय देवस्थान,येथे इनाम जमिन हडप करण्यात आलेल्या आहेत.

उपजिल्हाधिकारी भु-सुधार व राजकीय नेत्यांची मिलीभगत ,लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत तसेच ईडीमार्फत चौकशी करा – डाॅ.गणेश ढवळे
___
तत्कालीन उपजिल्हाधिकारी भु-सुधार बीड नरहरी शेळके, प्रकाश आघाव पाटील यांनी न्यायालयाचे आदेश डावलुन खिदमतमास इनामी जमिनी बनावट दस्तावेज तयार करून मदतमास दाखवून स्थानीय विविध पक्षाचे नेते यांनी त्यांच्या स्थानिक कार्यकर्ते यांच्या नावे हस्तांतरित आहे केल्या असुन राजकीय दबावापोटी व आर्थिक लाभातुन भुमाफियांची पाठराखण करत कारवाई करण्यास जाणीवपुर्वक टाळाटाळ करत असून संबधित प्रकरणात महसुल बुडवल्याबद्दल संबधित दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत व संबधित आधिकारी व त्यांच्या नातेवाईकांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करून बीड जिल्ह्य़ातील धार्मिक स्थळांच्या इनाम जमिन गैरव्यवहार प्रकरणाची ईडीमार्फत चौकशी करण्यात यावी.

डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो. नं.८१८०९२७५७२

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here