27.9 C
New York
Monday, April 29, 2024

Buy now

कवी रामदास पुजारी नागपूर येथून राज्यस्तरीय बाबुराव बागुल साहित्य पुरस्काराने सन्मानित

- Advertisement -

कवी रामदास पुजारी नागपूर येथून राज्यस्तरीय बाबुराव बागुल साहित्य पुरस्काराने सन्मानित

- Advertisement -

पारनेर : पारनेर तालुक्यातील पुणेवाडी येथील व सध्या सेवानिवृत्त वनाधिकारी, पुणे येथील कवी रामदास पुजारी यांना नुकताच नागपूर येथील आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
पारनेर जिल्हा अहमदनगर येथील कवी रामदास पुजारी यांच्या “उद्याच्या श्वासासाठी” या काव्यसंग्रहासाठी नागपूर येथील आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय बाबुराव बागुल साहित्य पुरस्कार प्रदान समारंभात अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व थोर साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. कवी रामदास पुजारी हे सध्या पुणे येथून वनविभागातून सेवानिवृत्त झालेले वनाधिकारी आहेत. शेती, निसर्ग आणि आई या विषयावर त्यांचा यापूर्वी आई माझं जग हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे.
आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त विविध साहित्यकृतींना पुरस्कार प्रदान समारंभ रविवार दि.३१ मार्च रोजी सिताबर्डी नागपूर येथील विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या मधुरम सभागृहामध्ये संपन्न झाला. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व थोर साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांचे हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्कार प्रदान करण्यात आलेल्या साहित्यकृतींमध्ये कवी रामदास पुजारी यांच्या ‘उद्याचा श्वासासाठी ‘ या कवितासंग्रहाचा समावेश आहे. वसुंधरेचे गीत गाणारे कवी पुजारी ‘ असा पुजारी सरांविषयी उल्लेख सबनीस सरांनी आपल्या भाषणात केला.
याप्रसंगी मंचावर महामंडळाचे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. दीपककुमार खोब्रागडे, छत्रपती संभाजीनगर येथील मिलिंद महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान, नाटककार डॉ. सुनील रामटेके, कादंबरीकार डॉ. विद्याधर बनसोड, महामंडळाचे सचिव डॉ. रवींद्र तिरपुडे, उपाध्यक्ष डॉ. विलास तायडे, कायदेविषयक सल्लागार ॲड..भूपेश पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
मा रामदास पुजारी यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल पारनेर साहित्य साधना मंचसह विविध साहित्यिक समूहातून अभिनंदन केले आहे.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles