27.9 C
New York
Monday, April 29, 2024

Buy now

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका

- Advertisement -

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश नागपूर खंडपीठाने दिले आहेत. २००६ च्या शासन निर्णयाच्या आधारे अरुण गवळी यांच्या सुटकेची मागणी केली होती. तशी याचिका देखील नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली होती.

- Advertisement -

त्यानंतर खंडपीठाने मुदतपूर्व सुटकेचे निर्देश दिले आहेत.

- Advertisement -

नागपूर खंडपीठात याप्रकरणी सुनावणी पूर्ण झाली होती. मात्र निकाल राखून ठेवला होता. दरम्यान अरुण गवळी यांची सुटका करण्याचे निर्देश नागपूर खंडपीठाने दिले आहेत.

१० जानेवारी २००६ रोजीच्या शासन निर्णयामध्ये वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेल्या, शारीरिकदृष्ट्या अशक्त झालेल्या आणि कारावासाची निम्मी शिक्षा पूर्ण केलेल्या कैद्यांना उर्वरित शिक्षेत सूट देऊन कारागृहातून मुक्त करण्याची तरतूद आहे.

याचा आधार घेत गवळीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. वयाची ६५ वर्षे पूर्ण केली आहेत. विविध शारीरिक आजार जडले आहेत. निम्मा कारावासही भोगला आहे. त्यामुळे कारागृहातून मुक्त करण्यात यावे, अशी विनंती गवळीने केली होती.

या प्रकरणात गृह विभाग आणि इतर प्रतिवाद्यांना हरकती घेण्यासाठी चार आठवड्यांचा अवधी दिला आहे.

गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली. तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. ही घटना २ मार्च २००७ रोजी घडली होती.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles