26.9 C
New York
Monday, April 29, 2024

Buy now

सोमवती अमावस्येला वर्षातील पहिले महाग्रहण, चुकूनही करु नका ‘या’ गोष्टी

- Advertisement -

ज्योतिषशास्त्रात सूर्य ग्रहणाला (Eclipse) फार महत्त्व आहे. ग्रहणाच्या प्रभावामुळे राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडतात. 54 वर्षानंतर चैत्र नवरात्रीच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी सूर्यग्रहण लागणार आहे.

- Advertisement -

त्यामुळे वर्षातील पहिले ग्रहण हे अतिशय खास असणार आहे. पंचांगानुसार 2024 मध्ये 8 एप्रिल रोजी पूर्ण सूर्यग्रहण होणार आहे. चैत्र अमावस्येला वर्षातील पहिले सूर्यग्रहण होत आहे. सूर्यग्रहण अशुभ मानले जाते. सूर्यग्रहण म्हटलं की, या काळामध्ये प्रत्येकाने योग्य ती खबरदारी घेणे सुद्धा खूप गरजेचे आहे. कारण ग्रहणाच्या वेळी राहुचा प्रभाव वाढतो, ज्यामुळे आपल्या जीवनाशी संबंधित सर्व गोष्टी प्रभावित होतात. यासाठी ग्रहणाच्या वेळी कोणतेही शुभ कार्य करणे वर्ज्य आहे. जाणून घ्या सूर्यग्रहण काळात काय करावे आणि काय करू नये.

- Advertisement -

ज्योतिषशास्त्रानुसार (Jyotish Shastra) सूर्यग्रहण काळात विशेष काळजी घेणे गरजेचे असते. सूर्यग्रहणामध्ये काही कामं करु नये असे सांगितले जाते. चुकून जर तुम्ही ती कामं केली जर तुमचे नुकसान होऊ शकते. अशावेळी सूर्यग्रहणाच्या वेळी कोणती कामं करणे टाळावीत हे आज आपण जाणून घेणार आहोत…

ग्रहण काळात अन्न सेवन करु नये

धार्मिक मान्यतेनुसार सूर्य किंवा चंद्र ग्रहणाच्या वेळी अन्न का खाऊ नये. पुराणात असे मानले जाते की ग्रहण काळात अन्न खाणाऱ्या व्यक्तीला नरक यातना भोगाव्या लागतात. सूर्यग्रहणाच्या सुतक काळात तुळशीच्या बिया धान्यात घालाव्यात.

झाडांना हात लावू नका

तुळशी, पिंपळाची झाडे पवित्र मानली जातात. सूर्यग्रहणाच्या काळात तुळशीची पाने तोडू नये. माता लक्ष्मी तुळशीमध्ये तर भगवान विष्णू पिंपळात वास करतात. सूर्यग्रहण काळात या झाडांना हात लावू नये. यामुळे धनाची देवी लक्ष्मी नाराज होते.

देवी-देवतांच्या मूर्तींना हात लावू नका

सूर्यग्रहणाच्या वेळी चुकूनही देवी-देवतांच्या मूर्तींना स्पर्श करू नका किंवा त्यांची पूजा करू नका. यामुळे दोष निर्माण होतो. यावेळी मंदिराचे दरवाजे बंद असतात. दिवसभर पुजा पाठ करा, यामुळे ग्रहणाचे दुष्परिणाम दूर होतील.

गर्भवती महिलांनी खबरदारी घ्या

सूर्यग्रहणाच्या दिवशी गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी. खबरदारी घ्या. सुतकच्या सुरुवातीपासून ग्रहण संपेपर्यंत घराबाहेर पडू नका. सुया, कात्री, चाकू इत्यादी धारदार वस्तू कोणत्याही कामासाठी वापरू नयेत.

खरेदी करण्यास मनाई

हिंदू मान्यतेनुसार सुतक काळात पृथ्वीचे वातावरण प्रदुषीत होते. सुतकातील अशुभ दोषांपासून सुरक्षित राहण्यासाठी अतिरिक्त काळजी घ्यावी. शास्त्रानुसार ग्रहण आणि सुतक काळात कोणतेही शुभ कार्य, पुजा किंवा खरेदी करू नये. कुंडलीत शुभ ग्रहांचा प्रभाव कमी होऊ लागतो.

नवीन काम सुरू करू नका

सूर्यग्रहण काळात नकारात्मक ऊर्जा वाढते, त्यामुळे या काळात कोणतेही नवीन काम सुरू करू नका किंवा कोणतेही शुभ कार्य करू नका. तसेच ग्रहणकाळात नखे कापणे आणि केस विंचरु नका.

सूर्यग्रहण काळात काय करावे

सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी सुरू होण्यापूर्वी मंदिराचे दरवाजे बंद करा. ग्रहणानंतर गंगाजलाने स्नान करून दान करावे. देवालाही गंगाजलाने स्नान घालावे. याच्या शेवटी गंगाजल शिंपडून संपूर्ण घर पवित्र करा. ग्रहणाच्या वेळी महामृत्युंजय मंत्राचा जप करा.

टीप : वरील सर्व बाबी नवगण न्युज केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून नवगण न्युज कोणताही दावा करत नाही.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles