18.4 C
New York
Monday, April 29, 2024

Buy now

राणांच्या पराजयासाठी व्यूहरचना करायची गरज नाही. जनता नवनीत राणा यांच्या विरोधात आहे – बच्चू कडू

- Advertisement -

अमरावती : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केलीय. विद्यमान खासदार असलेल्या नवनीत राणा यांच्या उमेदवारीवरून जिल्ह्यात अनेकांनी उघड नाराजी व्यक्त केलीय.

- Advertisement -

प्रहारचे बच्चू कडू यांनीही नवनीत राणांविरोधात आक्रमक भूमिका घेत उमेदवार जाहीर करणार असल्याचं सांगितलं होतं. आज आमदार राजकुमार पटेल यांनी अमरावतीमधून कोण उमेदवार असेल हे जाहीर केलंय. दिनेश बुब हे अमरावतीत प्रहारचे उमेदवार असणार आहेत.

- Advertisement -

शिवसेना ठाकरे गटाला अमरावतीत मोठा धक्का बसला आहे. दिनेश बुब यांनी शिवसेना ठाकरे गटाला रामराम करत राजकुमार पटेल यांच्या उपस्थितीत प्रहार पक्षात प्रवेश केला आहे. दिनेश बुब यांनी महाविकास आघाडीकडे लोकसभेची उमेदवारी मागितली होती. मात्र त्यांना तिकिट न मिळाल्याने प्रहारमध्ये प्रवेश केला.

दिनेश बुब यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की, जनतेच्या व बच्चू कडु यांच्या आग्रहासाठी मी निवडणूक लढवत आहे. सकारात्मक विचार घेऊन मी निवडणूक लढणार आहे. मी शिवसेनेचा राजीनामा दिला. शिवसेना माझ्या रक्तात आहे,ती जाणार नाही. भगवा झेंडा घेऊन प्रहारच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहे.

आमदार राजकुमार पटेल यांनी सांगितलं की, जिल्हात मैत्रीपूर्ण लढत लढण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. दिनेश बूब यांची प्रहारतर्फे उमेदवारी राजकुमार पटेल यांनी जाहीर केली. दिनेश बुब यांच्या पाठीमागे पूर्ण ताकत लावून प्रहार त्यांना निवडणुकीत निवडून आणणार. जिल्ह्यात प्रहारचे 2 आमदार आहे,मात्र भाजपने आम्हाला विश्वासात घेतले नाही. लोकसभेची एकही जागा दिली नाही म्हणून आणि उमेदवार उभा केला.

राणांच्या पराजयासाठी व्यूहरचना करायची गरज नाही. जनता नवनीत राणा यांच्या विरोधात आहे. भाजपच्या कार्यकर्त्याला रक्त बंबाळ होईपर्यंत राणा यांनी मारलेलं आहे. हे भाजप कार्यकर्ते मनातून विसरणार नाही. त्यामुळे ब्रह्मदेव जरी आला तरी नवनीत राणा यांना विजयी होऊ शकणार नाही असं बच्चू कडू यांनी म्हटलं होतं.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles