16.7 C
New York
Monday, April 29, 2024

Buy now

मराठा आरक्षणासाठी एक दिवसीय विशेष अधिवेशन, मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी घोषणा

- Advertisement -

मुंबई : मराठा आरक्षणसाठी मनोज जरांगे पाटील अजूनही लढत आहेत. त्यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं असून त्यांचा सातवा दिवस आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली आहे.

- Advertisement -

मागास आयोगाकडून अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देण्यात आला आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार सव्वादोन कोटी कुटुंबांचे सर्वेक्षण यात करण्यात आले आहे. त्याचा संपूर्ण डेटा या अहवालात सादर करण्यात आलं आहे. मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणावर टिकणार कायद्याच्या चौकटीत बसणारे, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण देता येईल हा विश्वास वाटतो.

हा अहवाल मंत्रिमंडळासमोर मांडला जाईल त्यासाठी 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन घेण्यात येणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक आहे, त्यामुळे जुन्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे कमीटी बसवण्यात आली आहे.

सरकार सकारात्मक असतानाही मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केलं. एकतर सरकार सकारात्मक असताना पुन्हा उपोषण झालं हे चुकीचंच आहे. हे आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

मनोज जरांगेबाबत हेल्थ अपडेट
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज सातवा आहे. काल मराठा बांधवांच्या आग्रहामुळं जरांगे पाटलांनी सलाईन घेतलं. सगे सोयरे शब्दाच्या अंमलबजावणीच्या मागणीसह इतर काही मागण्यांसाठी जरांगे पाटील उपोषण करत आहेत. काल प्रशासनाचं शिष्टमंडळ जरांगे पाटालंसोबत चर्चा करण्यासाठी आलं होतं. मात्र जरांगे पाटलांनी सगे सोयरे शब्दाची विशेष अधिवेशनात अमंलबजावणी होणार का हे लिहून आणलं का? असा सवाल त्यांना विचारताच प्रशासन माघारी परतलं. उपोषणाचा आजचा सातवा दिवस असून, जरांगे पाटलांची तब्येत खालावत आहे.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles