नाशिकमधील संमेलनात ७० गझलकारांनी भरले रंग

spot_img

गझल मोठी झाली पाहिजे – डॉ. शिवाजी काळे

नाशिकमधील संमेलनात ७० गझलकारांनी भरले रंग

नाशिक : गझलकार्य करणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांचे मार्ग वेगळे असले तरी ध्येय मात्र एकच आहे. हे कार्य एकमेकांना पूरक असले तरी गझलकारांची एकूण मानसिकता, श्रेष्ठत्व, आणि वर्चस्वाची भावना हे लक्षात घेता त्यांच्यात एकजूट होणे अशक्य आहे. असे असले तरी यात गैर काही नाही.

परंतु गझलेच्या प्रचार प्रसारासाठी काम करणाऱ्या संस्था असतील तर त्यांचे स्वागत केले पाहिजे व गटतट विसरून सर्वांनी गझलकार्य केले पाहिजे. कारण शेवटी गझल मोठी होणे महत्त्वाचे आहे. मग मार्ग कोणतेही असोत, असे प्रतिपादन ज्येष्ठ गझलकार डॉ शिवाजी काळे यांनी केले.
नाशिक येथे गझल मंथन साहित्य संस्थेने आयोजित केलेल्या एक दिवसीय गझल संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन संगीतकार डॉ. आशिष मुजुमदार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून गझलगुरू उर्मिला बांदिवडेकर, संस्थेचे सचिव गझलकार जयवंत वानखडे उपस्थित होते. यावेळी डॉ. काळे पुढे म्हणाले, की गझल शिकण्यासाठी मार्गदर्शन आणि मार्गदर्शकांची आवश्यकता असते.

यातून केवळ संख्यात्मक वाढ होते गुणात्मक नाही असेही काहींचे मत आहे. पण गुणात्मक वाढीसाठी संख्यात्मक वाढीची कशी गरज आहे, हे पटवून देताना ते म्हणाले की, शिक्षक नसेल तर विद्यार्थी स्वबळावर शिकतील का ? शाळांची जशी विद्यार्थ्यांना गरज असते तशीच मार्गदर्शनाची गझलकारांना गरज असते. गझल हा कष्टसाध्य काव्यप्रकार आहे. म्हणून कार्यशाळा गरजेच्या आहेत. शंभर लोक लिहित असतील तर पन्नास बरे लिहितील. पन्नास बरे लिहिणाऱ्यातील वीस चांगले लिहितील. त्यापैकी किमान पाच तरी उत्कृष्ट आणि एकतरी सर्वोत्कृष्ट लिहिल. म्हणून शंभरांना शिकवण्याची गरज आहे. आधुनिक गझलेचा लोकाभिमुख लहेजा आणि बदललेला आशयविषय याविषयी देखील त्यांनी मार्गदर्शन केले. गझलमंथनचे गझल प्रचार आणि प्रसारातील कार्य आणि विस्तार कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

चावडीवर जात नाही फारसा
त्यामुळे मी ज्ञात नाही फारसा

छानशा गझलेत रमतो फक्त मी
फालतू वादात नाही फारसा

अशा उत्कृष्ट शेरांच्या माध्यमातून त्यांनी संमेलनात चैतन्य निर्माण केले होते.
तुम्ही चांगली गझल लिहिली तर आम्ही तिला संगीतबद्ध करून ती रसिकांपुढे घेऊन येऊ. तुमच्या उत्तमोत्तम गझला रसिकांच्या ओठांवर रूळतील असे विचार उद्घाटक डॉ. आशिष मुजुमदार यांनी व्यक्त केले.
गझलेचे तंत्र महत्त्वाचे असून ते योग्य मार्गदर्शकांकडून शिकवले गेले पाहिजे. यासाठी कार्यशाळा घेतल्या गेल्या पाहिजेत. भविष्यात आम्ही अशा कार्यशाळा घेत राहू, व नवोदितांना प्रोत्साहन देत राहू असे संस्थेचे सचिव जयवंत वानखडे यांनी सांगितले. गझलगुरू उर्मिला बांदिवडेकर यांनी गझल संमेलनास शुभेच्छा दिल्या.
खान्देश विभाग प्रमुख काशिनाथ गवळी यांनी प्रास्ताविक केले. यात त्यांनी प्रस्थापितांसोबतच नवोदित गझलकारांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गझल मंथन साहित्य संस्थेची स्थापना झाली असल्याचे सांगून २७ पेक्षा जास्त एक दिवसीय कार्यक्रम, १ दोन दिवसीय अखिल भारतीय गझल संमेलन, अखिल भारतीय महिला गझल संमेलन व महाराष्ट्रातील प्रत्येक विभागात एक दिवसीय गझल संमेलन घेण्याचा मानस आहे. त्याची पूर्व तयारी सुरू आहे. पुण्यनगरी नाशिक च्या या सम्मेलना पासून धडक्यात सुरुवात झाली आहे . प्रसंगी खान्देश विभाग व जिल्हा कार्यकारिणी तर्फे मान्यवरांचा पुष्पगुच्छ, शॉल श्रीफळ, ग्रंथ व स्मृतिचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी गझल मंथन साहित्य संस्थेच्या वतीने संस्थेच्या स्थापनेपासून सोबत असलेल्या व एक निष्ठेने गझलेच्या प्रचार प्रसारासाठी संस्थेसोबत काम करीत असल्याबद्दल विभाग प्रमुख काशिनाथ गवळी, जिल्हाध्यक्षा मृणाल गिते व विभागाच्या सहसचिव यशश्री रहाळकर यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रतिष्ठेचा समजला जाणारा या वर्षीचा ‘गझलयात्री पुरस्कार २०२४ देऊन सन्मानित करण्यात आले.
त्या नंतर प्रत्यक्ष मुशायऱ्यांना सुरुवात झाली. दिवसभरात एकूण ६ मुशायरे संपन्न झाले ज्यात ७० हुन अधिक नवोदित तसेच प्रस्थापित गझलकारांनी आपल्या उत्तमोत्तम गझला सादर केल्या. यातील अनेक गझलांना मुकर्रर… अर्थात वन्समोअर आणि भरपूर टाळ्यांची दाद मिळाली. वाह क्या बात है! इर्शाद आदी उत्साह वाढवणाऱ्या शब्दांची लयलूट गझलकार करीत होते. सर्व सहभागी गझलकारांना कार्यकारिणी तर्फे सहभागाबद्दल प्रशस्तीपत्र, आकर्षक स्मृतिचिन्ह व ग्रंथ भेट देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
अरूण सोनवणे, ऊर्मिला बांदिवडेकर, संजय गोरडे, जयवंत वानखडे, हिरालाल बागूल व राजेश्वर शेळके यांनी मुशायऱ्यांचे अध्यक्षपद भूषविले. मुख्य सोहळ्याचे सुत्रसंचालन नाशिक जिल्हा कार्यकारिणी अध्यक्षा मृणाल गीते यांनी केले. गझलयात्री पुरस्काराचे सुत्रसंचालन नाशिक जिल्हा उपाध्यक्षा संध्या भोजने यांनी केले. कमालीच्या यशस्वी ठरलेल्या या मुशायऱ्यांचे सुत्रसंचालन यशश्री रहाळकर, अलका कुलकर्णी, नंदकिशोर ठोंबरे, बाळासाहेब गिरी, संध्या भोजने व डॉ. अंजना भंडारी यांनी केले. या एक दिवसीय गझल संमेलनाच्या यशस्वीतेसाठी राज्य कार्यकारिणीचे अध्यक्ष अनिल कांबळे, उपाध्यक्ष देवकुमार गुमटकर, सचिव जयवंत वानखडे, सहसचिव उमा पाटील, संमेलनाध्यक्ष डॉ. शिवाजी काळे यांचे मार्गदर्शन लाभले तर खान्देश विभाग प्रमुख काशिनाथ गवळी, उपविभाग प्रमुख अ‍ॅड मुकुंदराव जाधव, सचिव बाळासाहेब गिरी, सहसचिव यशश्री रहाळकर, कोषाध्यक्ष अतुल देशपांडे तसेच नाशिक जिल्हा कार्यकारिणी अध्यक्षा मृणाल गिते, उपाध्यक्षा संध्या भोजने, सचिव नंदकुमार ठोंबरे, संयोजक गोरख पालवे व नितीन गडवे, सदस्य अलका कुलकर्णी, जयश्री कुलकर्णी, स्मिता बनकर डॉ. अंजना भंडारी, डॉ. मधुचंद्र भुसारे आदींनी परिश्रम घेतले. आभार गोरख पालवे यांनी मानले.
_____________________
भरत माळी
प्रसिद्धी प्रमुख
गझल मंथन साहित्य संस्था (रजि.)
मो. 9420168806

Related Articles

Latest Articles

महाराष्ट्र न्युज 24 - सविस्तर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

spot_img
spot_img

लोकशाही न्युज 24 - सविस्तर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

spot_img

भगवान शंकराचे स्तंभेश्वर मंदिर,दिवसातून दोनदा गायब होतं महादेवाचे ‘हे’ मंदिर

भारतीय हिंदू संस्कृतीत मंदिराचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मंदिर हे देवाचे स्थान आहे. भारतात फक्त पूजा-अर्चनाच नाही तर इतरही धार्मिक कार्ये केला जातात. भारतातील अशी अनेक...

‘सीता’ सिंहिण ‘अकबर’ सिंह नावावरण वाद, हायकोर्टाने दिला मोठा निर्णय..

पश्चिम बंगालमधल्या (West Bengal) एका प्राणी संग्रहालयात सिंह आणि सिंहिणीला देण्यात आलेल्या नावावरुन मोठा वाद उभा राहिला आहे. हे प्रकरण कोलकाता हायकोर्टापर्यंत पोहोचलं आहे. हायकोर्टाने...

अकॅडमीच्या संचालकने ‘तू काळी आहेस’ म्हणून हिणवले, तरुणीने संपवलं जीवन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, वाळूज भागातील बजाजनगरातील गरुडझेप अकॅडमीत पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या एका 19 वर्षांच्या...

हुक्का बारवर बंदी विधेयकास मंजुरी; सिगारेट विक्रीवरही राहणार बंदी; दंडासह तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास

राज्याने २१ वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. बंगळूर : कर्नाटक सरकारने (Karnataka Government) बुधवारी राज्यभरात हुक्का बारवर...

एसटीचा मोफत प्रवास,दरवर्षी सलग सहा महिन्यांकरिता मोफत प्रवास पास मिळणार कोणाला ?

महाराष्ट्रातील एसटी महामंडळाकडून विविध प्रकारच्या सवलती दिल्या जात असून त्यात सर्व वर्गातील महिलांसाठी बस तिकिटांवर 50% सवलत सुरू आहे. अशातच परिवहन महामंडळाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना...