गणेशोत्सवासाठी उत्साहात निघाले होते गावी, पण तो बस प्रवास अखेरचाच ठरला.

spot_img

डोंबिवली : गणेशोत्सव अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला असून राज्यात सर्वत्र सणाचा उत्साह पहायला मिळत आहे. गणेशोत्सवानिमित्त अनेक चाकरमान्यांची कोकणातील गावी जाण्यासाठी लगबग देखील सुरू आहे.

मात्र ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावरच एक दुर्दैवी घटना घडली आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या एका भीषण अपघातात  डोंबिवलीतील भाविकाचा मृत्यू झाला आहे. विनोद तारले असे मृत्यूमुखी पडलेल्या इसमाचे नाव असून त्यांची पत्नी आणि मुलगा देखील जखमी झाले आहेत. एसटीला डंपरने धडक दिल्याने हा अपघात झाला असून डंपर चालवणारा ड्रायव्हर फरार झाला आहे.

ऐन सणाच्या काळात ही दुर्घटना झाल्यामुळे हळहळ व्यक्त होत असून या अपघाताचे वृत्त समजताच डोंबिवली पश्चिम भागात शोककळा पसरली आहे.

गणेशोत्सवासाठी अनेक चाकरमानी दरवर्षी कोकणातील गावी जात असतात. ठाणे जिल्ह्यातील अनेक उपनगरातून कोकणी चाकरमानी बांधवांसाठी कोकणात जाण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून मोफत एसटी बसेस सोडण्यात आल्या आहेत. शनिवारी संध्याकाळी डोंबिवली पश्चिमेकडील रेल्वे ग्राउंड येथून हजारो प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या शेकडो एसटी बसेस कोकणाकडे रवाना झाल्या. त्यातील डोंबिवली येथून राजापूरच्या दिशेने निघालेली एक एसटी बसला (Mho14-bt 2665) डंपरने माणगावजवळ जोरात धडक दिल्याने भीषण अपघात झाला. बसमध्ये तेव्हा 38 प्रवासी होते. या धडकेमध्ये एक प्रवाशाचा मृत्यू झाला तर अन्य काही जखमी झाले.

काळाने घातला घाला

विनोद तारले असे मृत्यूमुखी पडलेल्या इसमाचे नाव असून ते डोंबिवली पश्चिम येथील रहिवासी होते. गणेशोत्सवासाठी विनोद हे त्यांची पत्नी आणि मुलगा यांच्यासह राजापूरला जात होते. मात्र त्यांचा हा बस प्रवास अखेरचा ठरला. अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्यांची पत्नी व मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ऐन सणाच्या काळात झालेल्या या अपघाताचे वृत्त कळताच हळहळ व्यक्त होत असून डोंबिवली पश्चिम भागात शोककळा पसरली.

Related Articles

Latest Articles

महाराष्ट्र न्युज 24 - सविस्तर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

spot_img
spot_img

लोकशाही न्युज 24 - सविस्तर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

spot_img

लग्नाचं आमिष देत,मुलीवरच 13 वर्षं बलात्कार; हा प्रसिद्ध अभिनेता कोण ?

छत्तीसगड पोलिसांनी बलात्कार आणि अनैसर्गिक सेक्स केल्याच्या आरोपाखाली अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक मनोज राजपूतला अटक केली आहे. मनोज राजपूतवर आपल्याच एका जवळच्या नातेवाईकावर लग्नाचं...

भगवान शंकराचे स्तंभेश्वर मंदिर,दिवसातून दोनदा गायब होतं महादेवाचे ‘हे’ मंदिर

भारतीय हिंदू संस्कृतीत मंदिराचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मंदिर हे देवाचे स्थान आहे. भारतात फक्त पूजा-अर्चनाच नाही तर इतरही धार्मिक कार्ये केला जातात. भारतातील अशी अनेक...

‘सीता’ सिंहिण ‘अकबर’ सिंह नावावरण वाद, हायकोर्टाने दिला मोठा निर्णय..

पश्चिम बंगालमधल्या (West Bengal) एका प्राणी संग्रहालयात सिंह आणि सिंहिणीला देण्यात आलेल्या नावावरुन मोठा वाद उभा राहिला आहे. हे प्रकरण कोलकाता हायकोर्टापर्यंत पोहोचलं आहे. हायकोर्टाने...

अकॅडमीच्या संचालकने ‘तू काळी आहेस’ म्हणून हिणवले, तरुणीने संपवलं जीवन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, वाळूज भागातील बजाजनगरातील गरुडझेप अकॅडमीत पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या एका 19 वर्षांच्या...

हुक्का बारवर बंदी विधेयकास मंजुरी; सिगारेट विक्रीवरही राहणार बंदी; दंडासह तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास

राज्याने २१ वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. बंगळूर : कर्नाटक सरकारने (Karnataka Government) बुधवारी राज्यभरात हुक्का बारवर...