CM शिंदेंच्या पत्रकार परिषेदला जाणार संजय राऊत, प्रश्नही विचारणार पण…

0
109
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या (16 सप्टेंबर शनिवारी) मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून मोठी तयारी करण्यात आलेली आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाचा 75 वा सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर 16 तारखेला होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मराठवाड्याच्या प्रश्नांसंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

राज्याच्या राजकारणात या मंत्रिमंडळाची बैठकीची जोरदार चर्चा रंगली आहे. तर या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकारांशी देखील संवाद साधणार आहेत. यावरून विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. तर, बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत आपल्याला संधी दिल्यास एक पत्रकार म्हणून उपस्थित राहणार असल्याचं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकार परिषदेत प्रश्न देखील विचारेन असं देखील संजय राऊत म्हणाले आहेत. संजय राऊत या पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार का? अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

संजय राऊत काय म्हणालेत?

“उद्या कॅबिनेटची बैठक होणार आहे आहे, त्यानंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलतील. त्यानंतर आम्ही त्यांच्याशी बोलू, तुम्ही किती खोटं बोलत आहेत ते आम्हाला ऐकायचं आहे. आम्हाला संधी मिळाली तर त्या पत्रकार परिषदेत आम्ही हजर राहू, समोरासमोर प्रश्न विचारु.”

“आम्ही देखील पत्रकार आहोत. आम्हाला जर पोलिसांनी अडवलं नाही तर, पत्रकार परिषदेत मी सुद्धा जाईन. तुमच्या हातामध्ये कायद्याच्या बंदुकी आहे, त्यामुळे तुम्ही अडवलं नाही तर मी नक्की जाणार आहे. तसेच मुख्यमंत्री यांना पत्रकार म्हणून प्रश्न विचारणार”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here