100 वर्षांपासूनचा रस्ता वाद निघाला निकाली

0
59
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

राहुरी :  तालुक्यातील देसवंडी गावामध्ये पवार वस्ती ते गिते वस्ती हद्दीचा रस्ता गेल्या 100 वर्षांपासून वादात सापडला होता. महाविकास आघाडी शासन काळात राज्यमंत्री असलेले आमदार प्राजक्त तनपुरे यांनी संबंधित रस्त्याला भरीव निधी देऊनही रस्त्याचा वाद मिटत नव्हता.

अखेरीस आमदार तनपुरे यांनीच देसवंडी गावात उपस्थिती देत पवार-गिते वस्ती रस्त्याचा वाद निकाली काढल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. देसवंडी गावामध्ये आमदार तनपुरे यांनी भरीव निधी देत गावाच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले आहे. दरम्यान, गावातील पवार व गिते या दोन्ही वस्त्यांना जोडणार्‍या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झालेली होती. रस्त्यावरील दोन्ही बाजुच्या स्थानिक ग्रामस्थांचा वाद असल्याने रस्त्याचे काम होत नव्हते. 100 वर्षांपासून असलेला रस्त्याचा वाद सोडवायचा कसा? याबाबत ग्रामस्थांमध्येही संम्रभ होता.

रस्त्यावरून शालेय विद्यार्थी, शेतकरी, महिला, ज्येष्ट नागरीकांना दैनंदिन प्रवास करताना मोठी अडचण येत होती. त्यामुळे ग्रामंपचाय सदस्या मंगलताई रावसाहेब पवार, डॉ. प्रकाश पवार यांनी आ. तनपुरे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर महाविकास आघाडी शासन काळात आ. तनपुरे हे राज्यमंत्री असताना रस्त्यासाठी 21 लक्ष रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला होता. परंतु वादामुळे रस्त्याचे काम होत नव्हते. दोन्ही बाजुने वाद विवाद असल्याने रस्त्याचे कामाला प्रारंभ होत नसल्याने ग्रामस्थही हतबल झाले होते. डांबरीकरण होत नसल्याने ग्रामस्थांना चिखलातूनच वाट काढावी लागत होती.

याबाबत आमदार तनपुरे यांनी प्रत्यक्ष दखल घेत देसवंडी गावात उपस्थिती दिली. वाद असलेल्या दोन्ही कडील लोकांना बोलाऊन घेत रस्त्याबाबत समजूत काढली. पवार व गिते वस्ती रस्त्यालगतच्या वाद असलेल्या ग्रामस्थांची समजूत काढली. ग्रामस्थांनीही गावाच्या विकासासाठी मतभेद बाजुला टाकत रस्त्याच्या कामाला होकार दिला.

गावातील वाद मिटल्यानंतर ग्रामस्थांनी आनंद साजरा केला. त्यानंतर आमदार तनपुरे यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी एकत्र येत 21 लक्ष रूपयांच्या रस्त्याच्या कामाचे भुमीपूजन केले. याप्रसंगी सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख रावसाहेब खेवरे व उत्तमराव पवार यांनीही रस्त्याच्या कामासाठी मोलाचे सहकार्य केले. डॉ. प्रकाश पवार, अ‍ॅड. मोहन पवार, दत्तात्रय पवार, दामोधर पवार, युवराज पवार, अशोक गिते, बापु गिते, काकासाहेब शिरसाठ, दत्तात्रय कोकाटे, नामदेव शिरसाठ, अशोक भिसे, नानासाहेब शिरसाठ, प्रकाश शिरसाठ, भास्कर पवार, सुदाम पवार, रवी पवार, गणेश पवार, अनिल पवार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here