बैलजोडीचे पूजन करून ओबीसींचे आंदोलन; विविध संघटनांचा वाढता पाठिंबा

0
50
नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

नागपूर: मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र सरसकट देण्यात येऊ नये आणि ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विचार सोडावा म्हणून कुणबी आणि ओबीसी समाजातर्फे नागपुरातील संविधान चौकात साखळी उपोषण सुरू आहे.

कुणबी, ओबीसी कृती समितीच्या आंदोलनाला विविध जाती आणि संघटनांचा दररोज वाढत आहे. या आंदोलनात कुणबी, तेली, माळी, पोवार, मुस्लीम समाजाचा पाठिंबा आहे. आज पोळ्या निमित्त बैल जोडीचे पूजन करून आंदोलन व उपोषणास सुरुवात झाली आहे. आमदार सुनील केदार, माजी आमदार सुधाकर कोहळे, कृती समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम शहाणे पाटील, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष प्रा. बबनराव तायवाडे यांच्यासह कृती समितीचे सर्व सदस्य विविध समाज संघटनांचे प्रतिनिधी व उपोषणकर्ते उपस्थित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here